Wild Animal Crop Damage : शेतशिवार धोक्यात! वन्यजीव त्रासाचा प्रश्न गंभीर

Crop Loss : ठाणे जिल्ह्यात जंगलातील शेतशिवारात वन्यजीवांचा उपद्रव वाढला आहे. यात प्रामुख्याने जंगली डुकरे, वनगाईंचा मोठ्या प्रमाणावर हैदोस वाढला आहे.
Wild Animal Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Thane News : ठाणे जिल्ह्यात जंगलातील शेतशिवारात वन्यजीवांचा उपद्रव वाढला आहे. यात प्रामुख्याने जंगली डुकरे, वनगाईंचा मोठ्या प्रमाणावर हैदोस वाढला आहे. जंगलात खाद्याची कमतरता असल्याने प्राण्यांनी थेट शेतशिवारावर आक्रमण केले आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीने खरिपातील पिके हातातून गेल्यानंतर आता रब्बीत हरभऱ्यावर व तुरीवर गंडांतर आले आहे.

२०२३-२४ मध्ये रब्बी हंगामात ५,१६४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली होती, तर यंदा एकूण ५,६८० हेक्टर क्षेत्रात रब्बीची लागवड झाली आहे.ठाणे जिल्ह्यातील तूर, हरभरा, वाल, भेंडी, काकडी, वांगी, कारले इत्यादी प्रमुख पिके खाण्यासाठी जंगली जनावरे शेतात येतात. आता जंगली जनावरे हातातोंडाशी आलेल्या पिकाचा फडशा पाडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला फटका बसत आहे. लागवड झालेल्या तूर, हरभरा या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

रात्रीच्या जागरणाने शेतकऱ्यांची झोपमोड होत असून, अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. कृषी विभागाने एकूण ८८ क्विंटल मसूर बियाणे मिनी किट वाटप केले आहे. त्यानुसार १७६ हेक्टरवर मसूर लागवडीचे पीक येणार आहे.

Wild Animal Crop Damage
Wild Animal Crop Damage : वन्यप्राण्यांपुढे शेतकरी हतबल ; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

तर हरभरा लागवड २,४५५ हेक्टर व इतर कडधान्य २,९४० हेक्टर, गळीत धान्य ७० हेक्टर, तृणधान्य २१७ हेक्टर अशी लागवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त हरभरा पीक प्रात्यक्षिके ४९३ हेक्टर व भुईमूग पीक प्रात्यक्षिके १२० हेक्टरवर राबवले आहे; मात्र नीलगाई, डुक्करांमुळे तूर, हरभरा पिके धोक्यात आली आहेत.

Wild Animal Crop Damage
Wild Animal Crop Damage : हरणांच्या कळपांमुळे शेतकरी त्रस्त

आवाज निष्कळ

पीक संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम बेल शेतात लावल्या आहेत. हवेच्या झोतात त्या वाजतात. अनेक जण डफ वाजवतात. आवाज बंद होताच पुम्हा प्राण्यांचा उपद्रव वाढतो.

झटका मशीनही निकामी

जंगली प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी काही शेतकऱ्यांनी सौरऊर्जा झटका मशीन लावली आहे. कुणी काचेच्या बाटल्या लावल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी लायटिंगचा प्रयोग केला आहे.

नीलगायींच्या वाढत्या उपद्रवामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामाकडे पाठ फिरवली आहे. वारंवार तक्रारी करूनही वन विभाग दुर्लक्ष करीत आहे.
- सुभाष हरड, माजी उपसभापती, पंचायत समिती शहापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com