PM Rural Housing Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Ramai Awas Yojana : जळगाव जिल्ह्यात रमाई आवास योजनेच्या घरकुलांची कार्यवाही संथ

Ramai Gharkul Scheme : सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या ‘रमाई घरकुल’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली होती.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

जळगाव ः सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या ‘रमाई घरकुल’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली होती.

परंतु वर्षभरातही यासंबंधीची कार्यवाही संथ आहे. रमाई घरकुल योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना असून ज्यांना निवासाची व्यवस्था नाही अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या व सर्वसामान्यांना नागरिकांना स्वतःच्या जागेवर राज्य सरकार पक्क्या स्वरूपाची घरबांधणीची व्यवस्था करून देत असल्याने ही योजना वरदान ठरत आहे.

या रमाई घरकुल योजनेत २०२३-२४ साठी जिल्ह्यासाठी ३ हजार ५६६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मातंग समाजातील व मातंग समाज वगळून इतर अनुसूचित जातीसाठी घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

मंजूर करण्यात आलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

तालुकानिहाय मंजूर घरकुले

तालुका घरकुले

जळगाव १२७

धरणगाव ११७

अमळनेर ३२

चाळीसगाव २२६

पाचोरा २५

भडगाव ३८

एरंडोल ८१

पारोळा ४३१

भुसावळ ४९

जामनेर १४१

चोपडा ८०

मुक्ताईनगर २५२

बोदवड ११४

रावेर ९२

यावल ४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता पती, वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक, काय आहे नवीन नियम

Fish Food: मत्स्यखाद्यासाठी ब्लॅक सोल्जर माशीच्या अळ्या

Agriculture Technology: यंत्रसामग्रीच्या व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

Orange Farmers: संत्रा बागांचे पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या

Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती

SCROLL FOR NEXT