PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी यंत्रणेला मार्गदर्शन

Gharkul Scheme : विभागातील नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावयाची आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.
Gharkul Scheme
PM Awas Yojana Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : विभागातील नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावयाची आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्याचा यंत्रणेने लाभ घ्यावा. लोकांना परवडणारी घरे देण्याचे कार्य सुलभ व्हावे यासाठी हे प्रशिक्षण असून त्याचा लाभ घ्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सोमवारी (ता.१७) दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चे विभागस्तरीय- शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ पायाभूत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणात विभागातील ५ महानगरपालिका व ७५ नगरपालिकांचे मुख्याधिकारी, अभियंते, आवास योजनेशी संबंधित तांत्रिक सल्लागार आदी सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते.

Gharkul Scheme
PM Awas Yojana : 'घरकुल' योजनेतील लाभार्थी कुटुंबांना मोफत वीज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

प्रशिक्षक म्हणून गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रवींद्र खेतले, राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे वरिष्ठ सल्लागार मुकुल बापट, राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे सल्लागार सारिम खान आदी उपस्थित होते.

Gharkul Scheme
PM Awas Yojana : पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत एक लाख २० हजार नोंदणी पूर्ण

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करतांना पहिल्या टप्प्यात ज्या अडचणी आल्या. त्यावर उपाययोजना शोधाव्या यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन आहे. त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. तांत्रिक आणि प्रत्यक्ष अडचणींचे निराकरण होण्यासाठी प्रशिक्षणातून मार्गदर्शन घ्यावे.

या प्रशिक्षणात योजनेचा आढावा, प्रगती, निधी वितरण, अखर्चित निधी, जिओ टॅगिंग याबाबत रवींद्र खेतले, प्रधानमंत्रीआवास योजनेची ध्येय्य, उद्दिष्टे व अंमलबजावणी याबाबत मुकुल बापट, प्रधानमंत्री आवास योजनेचे युनिफाईड पोर्टल, ऑनलाइन अर्ज भरणे याबाबत सारिम खान हे मार्गदर्शन करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com