Manikrao Kokate  Agrowon
ॲग्रो विशेष

Potato Seed : राज्यात चार विद्यापीठे असूनही बटाटे बियाणे निर्मितीच होत नाही

Potato Farming : राज्यातील सुमारे दहा जिल्ह्यांत बटाट्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र राज्यात चार कृषी विद्यापीठे असूनही बटाटा बियाणांची निर्मिती होत नाही.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : राज्यातील सुमारे दहा जिल्ह्यांत बटाट्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र राज्यात चार कृषी विद्यापीठे असूनही बटाटा बियाणांची निर्मिती होत नाही. बटाटा बियाणांवर फारसे संशोधन झाले नाही. राज्यात दर्जेदार बियाणे मिळत नाही. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना परराज्यातून बियाणे मागवावे लागते. त्यामुळे आपसूकच खर्च वाढतो अशी खंत बटाटा पिकांतील अभ्यास व उत्पादक शेतकरी गोवर्धन खेडकर यांनी कृषिमंत्र्यांकडे खंत व्यक्त केली.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतेच विभागीय शेतकरी कार्यशाळेत अभ्यासू शेतकऱ्यांचा परिसंवाद कार्यक्रम झाला. त्यात भालगाव (ता. पाथर्डी) बटाटा पिकांतील अभ्यासू व उत्पादक शेतकरी गोवर्धन प्रल्हाद खेडकर सहभागी झाले होते. त्यांनी राज्यात बटाटा बियाणेच निर्मिती होत नसल्याची खंत कृषिमंत्र्याकडे व्यक्त केली.

राज्यात अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगलीसह दहापेक्षा अधिक जिल्ह्यांत बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. विविध पिकांत आंतरपीक म्हणूनही बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. दुष्काळी भागातील पीक म्हणून बटाटा पीक पुढे येत असताना दर्जेदार बियाणे मिळत नसल्याने उत्पादन कमी होत आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठे असताना बाहेरील राज्यातून बटाटा बियाणे आणून लागवड करावी लागते. यामुळे एकरी उत्पादन खर्च वाढतो. शीतगृहाची सुविधा नाही.

सध्या पंजाब, गुजरातमधून तीन नंबर बियाणे येते. त्यामुळे महाराष्ट्रात बटाट्याची उत्पादकता कमी आहे. राज्यात सध्या एकरी ८ ते १२ टनापर्यंत उत्पादन मिळते तर अन्य राज्यात एकरी १५ टनापर्यंत उत्पादन येत आहे. बियाणे वाहतूक, व अन्य बाबींमुळे दुप्पट दराने बियाणे खरेदी करावे लागत आहे. खासगी टिश्युकल्चरमधील बटाटा बियाणे तयार करण्याला सुरुवात झाली असताना सरकारी संशोधन केंद्रातून फारसे काही केले जात नसल्याची खंत खेडकर यांनी व्यक्त केली.

बटाटा हे पीकविमा योजनेत समाविष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले. हवामानाची अनुकूलता नाही. हवामानास अनुकूल राहील, असे संशोधित बटाटा वाण निर्मितीसाठी संशोधन सुरू असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. असले तरी बटाटा बियाणांबाबत फारसे सांगू शकले नाही. कोकाटे यांनी बटाटा बियाणांबाबत संशोधनासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना संशोधन केंद्राला दिल्याचे सांगण्यात आले.

राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. राज्यभर बटाटा उत्पादन घेतले जाते. मात्र बटाटा बियाणे निर्मिती होत नाही. इतर राज्यातून बियाणे आणल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. इतर राज्याप्रमाणे शीतगृह सुविधा नाही. शीतगृह सुविधांसाठी काही शेतकरी हिस्सा व काही अनुदान अशी योजना असावी. बटाटा आंतरपीक म्हणूनही चालते. मात्र अजूनही या पिकाकडे सरकार आणि विद्यापीठे, संशोधन केंद्राकडून गांभिर्याने पाहिले जात नाही.
- गोवर्धन खेडकर, बटाटा पिकांतील अभ्यासक, भालगाव, ता. पाथर्डी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurment : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार ४०० कोटी रुपये दिल्याची केंद्र सरकारची माहिती; सीसीआयच्या खरेदीपासून शेतकरी मात्र वंचित

Maharashtra Unseasonal Rain: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा

Village Governance: ग्रामसभा आणि ग्रामस्तरावरची अंमलबजावणी

Dam Water Storage: मंगरूळ, सुकी, अभोडा धरणांत जलसाठा मुबलक

Vidarbha Irrigation Projects: विदर्भातील ५ सिंचन प्रकल्पांची कामे भूसंपादनाअभावी प्रलंबित- गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT