Potato Farming
Potato Farming Agrowon

Potato Farming : पालघरमधील विद्यार्थ्यांनी फुलवली बटाट्याची शेती ; डहाणू किनारपट्टी परिसरात प्रायोगिक लागवडीला यश

Palghar News : दैनंदिन आहारासोबतच विविध खाद्यपदार्थांमध्ये बटाट्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने कायम चांगली मागणी असते. बटाट्यामधील प्रथिने, कर्बोदके, खनिजे, जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असतात.
Published on

Potato Production : वाणगाव : दैनंदिन आहारासोबतच विविध खाद्यपदार्थांमध्ये बटाट्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने कायम चांगली मागणी असते. बटाट्यामधील प्रथिने, कर्बोदके, खनिजे, जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असतात. हे पीक कमी कालावधीत तयार होणारे असून, अन्य पिकांच्या तुलनेत जास्त उत्पादन मिळते.

पालघर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांकडे प्रामुख्याने वळला आहे. हवामान आणि माती ही बटाटा पिकाला पोषक असल्याने डहाणूच्या किनारपट्टीच्या भागातही उत्तम प्रकारे पोसू शकतो, हे बटाटा लागवडीतून सिद्ध झाले आहे.

Potato Farming
Potato Peels : निरोगी आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे बटाट्याची साल; होतात अनेक आजार दूर

बटाटे चांगले पोसण्यासाठी थंड म्हणजे १८ ते २१ अंश तापमान अनुकूल असते. बटाट्यास थोडे- थोडे आणि कमी अंतराने पाणी देणे फायद्याचे ठरते. लागवडीनंतर साधारणतः २५ ते ३० दिवसांनी जमीन वाफशावर असताना बटाटा पिकाच्या वरंब्यास भर द्यावी, कारण या वेळी जमिनीखाली लहान आकाराचे बटाटे लागलेले असतात.

ते मातीने चांगले झाकल्यास व जमिनीत खेळती हवा राहिल्यास झाडांची वाढ जलद आणि चांगली होते. बटाटे उघडे राहत नाहीत. वरंबा भरभक्कम होण्यासाठी व भरपूर माती लागण्यासाठी बटाट्याच्या दोन ओळींतून रिजर चालवावा. १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान लागवड करावी. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीच्या थंडीत बटाटे पोसण्यास चांगला उपयोग होतो व अधिक उत्पादन मिळते.

कमी कालावधीत उत्पादन

८० ते ९० दिवसांत बटाटे काढणीसाठी तयार होतात. बटाटा बियाणे साधारणत: ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांना मिळते, तर बटाट्याला साधारण बाजारात १५ रुपये प्रतिकिलो दर मिळतो. लवकर येणाऱ्या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी २० टन येते. पालघर जिल्ह्यात गादी वाफ्यावर बटाटा अतिशय उत्तम येऊ शकतो.

शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या बटाट्याच्या जातींची निवड करावी. अवघ्या तीन महिन्यांतच उत्पन्न देत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी बटाटा लागवड करून समृद्धीकडे वाटचाल करावी आणि आपली आर्थिक घडी मजबूत करावी.

- मिलिंद पाटील,

शेतीमित्र पुरस्कार विजेता, आसनगाव

पालघर जिल्ह्यातील बाजारपेठेत राज्यातील इतर भागांतील बटाटा विक्रीसाठी येतो, मात्र स्थानिक भागात हे पीक घेतल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्कीच त्यातून आर्थिक लाभ मिळेल. बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून रब्बी हंगामात पोषक वातावरण असल्याने बटाटा लागवडीसाठी वळावे.

- सोनालिका पाटील, प्राचार्य

आधुनिक शेतीचे ज्ञान उपलब्ध झाल्यामुळे नोकरी करण्यापेक्षा शेतीकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन प्रबळ झाला आहे. बटाटा पिकाचे तंत्रज्ञान स्वतःच्या शेतीमध्ये वापरून गाव खेड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहोत.

- अस्मिता बुजड,

विद्यार्थिनी, कृषी तंत्र विद्यालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com