Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Humani Pest Outbreak : मानोरा तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप

Re-Sowing Crisis : आधीच काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Team Agrowon

Washim News : मानोरा तालुक्यात हुमणी अळीच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

अशात सोयाबीन पिकात हुमणी अळीच्या वाढत्या प्रकोपामुळे शेतातील झाडे वाळून जात आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.=

तालुक्यात या खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी यांसह अन्य पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात मानोरा तालुक्यात हुमणी अळीचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यासाठी आर्थिक फटका देणारा ठरला आहे.

जमिनीच्या आत राहणारी ही अळी सोयाबीन पीक फस्त करीत असल्याने जोमात असलेली पिके अक्षरशः वाळून जात शेत रिकामे होत आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला केलेला खर्च वाया गेला आहे. ऐन हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून त्यांच्या कुटुंबावर आर्थिक अरिष्ट्य ओढवले आहे.

पेरणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे हुमणी अळी बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

तीन एकर शेती बटाईने करून त्यामध्ये सोयाबीनची पेरणी केली आहे. त्या पिकात आता हुमणी अळीचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे जागोजागी शेत रिकामे दिसत आहे. पेरणी केलेला खर्च निघणे मुश्कील दिसून येत आहे.
- ज्ञानेश्वर चव्हाण, शेतकरी - आसोला खुर्द, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

Maharashtra Economic Survey: अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी ९ हजार कोटी मंजूर; आर्थिक पाहणी अहवालात सरकारची माहिती

Livestock Health: कोथळीत जनावरांना ‘लाळ्या खुरकूत’चा प्रादुर्भाव

Sugarcane Production : उन्हापासून उसाचे उत्पादन वाचवण्यासाठी सेंद्रिय उपाय

Khapli Wheat: खपली गहू पेरणीत खानदेशात घट

SCROLL FOR NEXT