डॉ. आनंद कर्वे
मी गेल्या १५ वर्षांपासून सेंद्रिय शेतीवर संशोधन (0Organic Farming Research करीत आहे. जीवामृत, पंचगव्य आणि बायोडायनॅमिक या सर्व पद्धतींमध्ये शेण (Cow Dung) वापरले जाते आणि त्यावर काही विशिष्ट प्रक्रिया करून मग ते शेतात वाढणाऱ्या वनस्पतींना दिले जाते.
याचा सखोल अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले की शेणातल्या बॅक्टीरियांमुळे (Bacteria In Cow Dung) वनस्पतींचे पोषण केले जाते. नास्ति मूलम् अनौषधम् (मुळांमध्ये औषधी गुण नाहीत अशी वनस्पती नाही) या सुभाषितातून मला एक नवा विचार सुचला.
तो म्हणजे वनस्पती बॅक्टेरियांना मारून त्यांच्या पेशिकांमधून आपल्याला लागणारे पोषक पदार्थ मिळवितात.
मातीत नेहमीच बॅक्टेरिया आढळतात. मातीच्या प्रकारानुसार त्यांची संख्या आणि प्रकारही भिन्न असतात. माझ्या एका सहकारी संशोधिकेने १० प्रकारच्या मातींवर प्रयोग करून हे दाखवून दिले की मातीच्या या नमुन्यांमध्ये वनस्पती वाढविल्यास केवळ ४० दिवसांत मातीतल्या बॅक्टेरियांची संख्या सरासरीने ७१ टक्क्यांनी कमी होते.
याच अनुषंगाने उद्भवणारा दुसरा मुद्दा म्हणजे रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खत वापरायचे असल्यास सेंद्रिय खत वापरून चांगले उत्पादन कोणत्या पिकातून आणि पिकाच्या कोणत्या वाणापासून मिळते ह्याचाही अभ्यास व्हायला पाहिजे होता.
ज्या ज्या देशांमध्ये आज रासायनिक खते वापरली जातात तेथे वापरल्या जाणाऱ्या संपूर्ण कृषितंत्राची निवड करतानासुद्धा रासायनिक खतेच वापरली जातात. त्यामुळे आपोआपच रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देणारी कृषिपद्धतीच निवडली जाते.
यात पिकांची वाणे, नांगरटीची पद्धत, पाणी देण्याची पद्धत, पीकसंरक्षक औषधे कोणती वापरावी, ती कधी आणि किती प्रमाणात वापरावी, अशा अनेक बाबींचा समावेश होतो.
रासायनिक खतांसाठी विकसित केलेले कृषितंत्र वापरून सेंद्रिय शेती केल्यास आपल्याला चांगले उत्पन्न मिळेलच अशी आपण काही हमी देऊ शकत नाही. त्यामुळे जर रासायनिक खते बंद करून सेंद्रिय शेतीकडे वळायचे असेल तर त्याआधी सेंद्रिय खतांना चांगला प्रतिसाद देतील अशी वाणे आणि अशी कृषिपद्धती शोधून काढावी लागेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.