
Solapur News: माळढोक पक्षी अभयारण्याच्या कुरणवाडी (ता. मोहोळ) हद्दीत सोमवारी (ता. २८) वन विभागातील कर्मचारी गस्तीवर असताना माळढोकसाठीच्या राखीव क्षेत्रात घातक रसायन सोडताना एक टँकर जप्त करण्यात आला आहे. टँकरचालकाने पलायन केले असून वाहनचालकाचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आले.
याबाबत माहिती अशी, की एमएच १२ एचडी ५५८२ या क्रमांकाचा टँकरने कुरणवाडी परिसरात हे रसायन टाकले गेले. परंतु वन विभागाच्या सतर्कतेमुळे हा टँकर पकडण्यात आला. पण या टँकरचा चालक पळून गेला आहे. वन्यजीव विभागाकडून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला टँकर हा सुमारे २० हजार लिटर क्षमतेचा आहे.
या टँकरवर पाण्याचा टँकर असे लिहिलेले आहे. पाण्याचा टँकर म्हणून वापरात असल्याचे दाखवून त्यातून रसायनयुक्त द्रव पदार्थ अभयारण्य क्षेत्रात सोडले जात असल्याचे या घटनेमुळे निदर्शनास आले आहे. हा प्रकार वन्यप्राणी व संरक्षित पक्ष्यांच्या तसेच भोवतालच्या शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका पोचविणारा असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकारानंतर नियंत्रण मंडळाचे सोलापूर येथील उपप्रादेशिक अधिकारी निखिल मोरे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ रसायनांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. दरम्यान, या घटनेत वनविभागामार्फत तपास सुरू करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये उपवनसंरक्षक (वन्यजीव) विवेक होशींग, सहाय्यक वनसंरक्षक किशोरकुमार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोरे, वनपाल जी. डी. दाभाडे, वनरक्षक मारोती मुंडकर, महावीर शेळके, वनरक्षक कौशल्या बडुरे, वनरक्षक सत्वशीला कांबळे, वनरक्षक सुनील थोरात व वनमजूर बाळू बोराडे, मारुती गवळी यांनी सहभाग घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.