Water Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Jaykwadi Water Issue : जायकवाडीसाठी पाणी सुटणार केव्हा?

Water Crisis : एकीकडे जायकवाडी प्रकल्पातून शेतकऱ्यांची गरज ओळखून पिकासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : एकीकडे जायकवाडी प्रकल्पातून शेतकऱ्यांची गरज ओळखून पिकासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांनी आदेश देऊनही जायकवाडीसाठी नगर, नाशिक भागातील प्रकल्पातून अजूनही पाणी सोडण्यात आले नसल्याची स्थिती आहे.

माहितीनुसार, ३० ऑक्टोबरला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी जायकवाडीच्या वरच्या भागातील मुळा धरण समूहातून २.१० टीएमसी, प्रवरा धरण समूहातून ३.३६ टीएमसी, गंगापूर धरण समूहातून ०.५ टीएमसी, गोदावरी दारणा धरण समूहातून २.६ टीएमसी असे एकूण ८.६० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. शिवाय पाणी सोडण्याची जबाबदारी आदेशात स्पष्ट केली होती.

या आदेशाचे सर्वतोपरी उचित पालन होण्यासाठी व सोडलेला विसर्ग जायकवाडी धरणामध्ये नियंत्रितपणे येण्यासाठी व संनियंत्रणासाठी तीन पथकही नियुक्त केले. परंतु ४ नोव्हेंबर सकाळपर्यंत जायकवाडीसाठी आदेशित केलेले पाणी सोडण्यात आले नव्हते.

समन्यायी पाणी वाटपाचा नियम व न्यायालयाच्या आदेशानंतरही जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबत जायकवाडी प्रकल्पाच्या वरच्या भागातील प्रकल्प प्रशासनाकडून पाणी का सोडले जात नाही, त्याला विलंब का केला जातो हा खरा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

.. ते पाप करू नये ः जयाजीराव सूर्यवंशी

दुष्काळग्रस्त आत्महत्येने पीडित असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे पाप करू नये, असा सल्ला अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी पाटील यांनी दिला आहे. जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्यासाठी नगर नाशिकच्या पुढाऱ्यांचा विरोध म्हणजे नोटंकी आहे.

पाणी सोडण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची असून त्यांना ती पूर्ण करावीच लागेल. वास्तविक पाहता जायकवाडी प्रकल्पामध्ये समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार पाणी वाटपाच्या धोरणानुसार १६ टीएमसी पाणी देणे गरजेचे होते.

तरीसुद्धा ८.६० टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. समन्यायी पाणी वाटपाचा कायदा असताना याला विरोध करणे म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करण्याचा प्रकार असल्याचा आरोप श्री सूर्यवंशी यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT