Mhaisal Water Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Water Scheme : जतमध्ये ‘म्हैसाळ’चे पाणी पोहोचणार कधी?

तालुक्याच्या पश्चिम भागात म्हैसाळ योजना पोहोचली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई दूर झाली आहे.

Anil Jadhao 

sangli News : म्हैसाळ योजना सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाला असून जत तालुक्यात अजूनही पाणी पोहोचले नसल्याने ऐन द्राक्ष हंगामात (Grape Season) पिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे.

मागणी नाही तर पाणीही नाही, असा पवित्रा पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) घेतल्याने शेतकरी संतप्त झाले असून योजनेचे पाणी कधी मिळणार, असा सवाल जत तालुक्यातील शेतकरी करू लागले आहेत.

वास्तविक, जत तालुका हा कायमचा दुष्काळी भाग आहे. या तालुक्याच्या पश्चिम भागात म्हैसाळ योजना पोहोचली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई दूर झाली आहे. योजनेचे पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागातील उमदीपर्यंत गेले आहे.

सध्या द्राक्ष, डाळिंबाचा हंगाम सुरू असून शेतीला पाण्याची कमतरता भासू लागली आहे. वेळेत पाणी मिळाले नाही तर, हातातोंडाशी आलेला हास हिरावला जाण्याची शक्यता आहे.

मुळात, कवठे महांकाळ, मिरज तालुक्यांतील शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी केली होती; मात्र, पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. परंतु पालकमंत्री सुरेश खाडे यांनी योजना सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर ही योजना सुरू झाली.

त्यामुळे म्हैसाळ योजनेचे या वर्षीचे आवर्तन सुरू झाले आहे. परंतु शेतकऱ्यांनी पाणी मागणीसाठी अपेक्षित अर्ज आले नाहीत. जत तालुक्यातून पाणी मागणीसाठी अर्ज आलेच नसल्याचे पाटबंधारे विभाग सांगत आहे. त्यामुळे त्यामुळे योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाही.

मुळात, पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांकडून पाणी मागणीच्या अर्जांची प्रतीक्षा करण्यापेक्षा योजना पूर्ण क्षमतेने सुरू करून दुष्काळी पट्ट्यातील शेतीला पाणी द्यावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

योजना सुरू होऊन तीन महिन्यांचा काळ लोटला तरीदेखील जत तालुक्यात पाणी पोहोचले नाही.

मागणी नाही तर पाणीही नाही

योजना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणीचा अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पाण्याची किती गरज आहे हे पाटबंधारे विभागाकडून अर्जावरून ठरवले जाते. त्यामुळे मागणी नसली तर पाणी नाही, असाच पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार असल्याचे चित्र आहे.

सध्या शेतीला पाण्याची आवश्यकता आहे. म्हैसाळ योजना सुरू झाली असली तरी जत तालुक्यात अद्याप पाणी आले नाही. जत तालुक्यात पाणी कधी मिळणार. वेळेत पाणी मिळाले नाही तर पिकांना पाणी कसे द्यायचे ?
रोहिदास सातपुते, शेतकरी, उमदी, ता. जत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT