Canal
Canal Agrowon

Mhaisal Irrigation Scheme : म्हैसाळ योजनेची ९८ कोटी पाणीपट्टी थकित

जतमधून मागणी अर्जच अजून आले नाहीत. जतमधून अजून वीजबिलासाठी रक्कम गोळा करण्यासाठी सुरुवात झाली नाही.
Published on

Sangli News : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील गावांना वरदायिनी ठरलेली म्हैसाळ योजना (Maisal Water Scheme) सध्या सुरू झाली आहे. म्हैसाळ योजनेची थकित पाणीपट्टी ९८ कोटी आहे. थकित वीजबिल १६.५ कोटी आहे.

सदरचे थकित वीजबिल भरल्याशिवाय पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत योजना सुरू ठेवणे अडचणीचे आहे. त्यामुळे योजना पूर्णक्षमतेने सुरू होणार नसल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली तरच योजना सुरू होईल, असा पाटबंधारे विभागाने घालून दिलेला नियम आहे. परंतु काही भागांत पाण्याची टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांनी ही योजना सुरू करावी, अशी मागणी केली होती.

Canal
Mhaisal Water Scheme : विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा

मात्र पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली.

त्यानुसार पाटबंधारे विभागाने योजना सुरू केली आहे. मात्र पाणीपट्टी वसूल झाली नसल्याने सध्या पाच टप्प्यांत १४ पंप सुरू आहेत. पंपगृह ६ अ व ब जतमधून मागणी नाही.

जतमधून मागणी अर्जच अजून आले नाहीत. जतमधून अजून वीजबिलासाठी रक्कम गोळा करण्यासाठी सुरुवात झाली नाही. त्यामुळे योजना पूर्णक्षमतेने सुरू होणार नाही. मिरज पूर्व भागात व कवठेमहांकाळमध्ये शेतकरी पाण्यासाठी रक्कम गोळा करीत आहेत.

Canal
Maisal Water Scheme : जत-म्हैसाळ विस्तारित योजना अहवाल पाठवण्याची सूचना

म्हैसाळचे सुरू असलेले पंप

पंपगृह क्रमांक १ (म्हैसाळ) ४

पंपगृह क्रमांक २ (नरवाड) ४

पंपगृह क्रमांक ३ (बेडग) २

पंपगृह क्रमांक ४ (लांडगेवाडी, आरग) ३

पंपगृह क्रमांक ५ (सलगरे) १

एकूण सुरू पंप १४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com