Power Station Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Power Substation : शेटफळेत वीज उपकेंद्र कधी होणार सुरू ?

Agriculture Electricity : शेटफळे (ता. आटपाडी) येथील वीज उपकेंद्र उभारणीला दहा महिने उलटले, तरीही वन विभागाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे कार्यान्वित झालेले नाही.

Team Agrowon

Sangli News : शेटफळे (ता. आटपाडी) येथील वीज उपकेंद्र उभारणीला दहा महिने उलटले, तरीही वन विभागाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे वीज नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणे अवघड झाले आहे. केवळ चार तास शेतीला वीज मिळत आहे.

तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आल्याने विजेच्या मागणीत चौपट वाढ झाली आहे. त्याचा करगणी उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडल्याने शेटफळे, हिवतड परिसराला सध्या शेतीला केवळ चार तास वीज पुरवठा सुरू आहे. त्यात २० वेळा पुरवठा खंडित झाला.

विजेची समस्या सोडवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी आमदार दिवंगत अनिल बाबर यांनी सात कोटींचे पाच मेगावॉट क्षमतेचे उपकेंद्र मंजूर करून आणले. ते पूर्ण केले. मात्र दहा महिन्यांपासून वन विभागाच्या कागदोपत्री खेळामुळे अद्याप कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे ओढे, विहिरींना मुबलक पाणी असूनही पिकांना देता येत नाही.

शेटफळे उपकेंद्राला पाचेगाव (ता. सांगोला) येथून वीजपुरवठा जोडला जाणार आहे. त्याचे काम पूर्ण आहे. मात्र वनीकरणात जेमतेम सहाशे फूट लांबीचे तीन विद्युत खांब उभारण्याचे काम रखडले आहे. या ठिकाणी झाडे नसतानाही वन विभागाने हे खांब उभारण्यास परवानगी नाकारली आहे.

आमदार सुहास बाबर यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. येथील ‘महावितरण’ उपविभागीय कार्यालयाने वन विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. त्याला वन विभागाने दरवेळी केराची टोपली दाखवली आहे. अधिवेशनातील लक्षवेधीनंतर वन विभागाने ‘महावितरण’कडे आधीची दिलेली माहिती, पुन्हा नव्याने विहित नमुन्यात मागवून घेतली.

तीही तत्काळ पाठवली. मात्र पुढे काहीच झालेले नाही. त्यामुळे सात कोटी रुपये खर्चून उभारलेले उपकेंद्र धूळ खात पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. संतप्त शेतकऱ्यांनी ‘महावितरण’समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

उपकेंद्राचे काम होऊन बराच कालावधी उलटला आहे. पाचेगाव वन विभागाच्या हद्दीतील तीन खांबांचं काम थांबलेले आहे. त्यासाठी वन विभागाशी पत्रव्यवहार आणि प्रयत्न सुरू आहेत.
- संजय बालटे, उपअभियंता, महावितरण, आटपाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing: देशातील खरीप पेऱ्यात चार टक्के वाढ

India Monsoon 2025: देशात सरासरी पाऊसमान, वितरण मात्र असमान !

Monsoon Rain: राज्यात वाढणार पावसाचा जोर

Farmer Incentive Subsidy Scheme : पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले

Kukadi Water Storage: ‘कुकडी’त ६८ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT