आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, मका आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीन स्थिरावलेदेशातील बाजारात सोयाबीनचे भाव काहीसे स्थिरावले आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक काहीशी वाढली आहे. त्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर दिसून येत आहे. सोयाबीनला सध्या बाजारात ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव ५ हजार ३०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनची आवक मंदावल्यानंतर बाजारालाही आधार मिळेल. दरात सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. .कापूस दरात नरमाईदेशातील बाजारात कापसाच्या भावात नरमाई कायम आहे. बाजारातील कापसाची आवक काहीशी सुधारलेली आहे. त्याचा परिणाम कापसाच्या दरावर दिसून येत आहे. तसेच सीसीआयची विक्री आणि आयातीचाही दबाव आहे. सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापूस बाजारातील आवक आणि दरस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .Agrowon Podcast: तुरीचा भाव स्थिरावला; सोयाबीनध्ये घट, कापूस दबावात, जिऱ्याला चांगला उठाव तर मोहरी आवक मर्यादीत.हरभरा स्थिरावलाहरभऱ्याचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. हरभऱ्याची बाजारातील आवक काहीशी वाढली आहे. अनेक बाजारात नवा हरभरा विक्रीसाठी येत आहे. मात्र, मालात ओलावा अधिक असल्याने दरपातळी काहीशी कमी दिसत आहे. सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर गुणवत्तेचा माल ५५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. बाजारातील हरभरा आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढणार आहे. त्यामुळे दरपातळी स्थिर राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: ज्वारीचे दर टिकून; सोयाबीन दर गडगडले, कापूस नरमले, कारले दरात चढ-उतार तर काकडी दरात सुधारणा.मका दबावातमक्याचा बाजारभाव मागील काही दिवसांपासून काहीसा दबवात आहे. अमेरिकेच्या डीडीजीएसच्या आयातीला परवानगी दिल्यामुळे सध्या बाजारावर परिणाम दिसत आहे. मात्र अमेरिकेत सध्या डीडीजीएसचा भाव जास्त आहे. तसेच लगेच आयात होणार नाही. तरीही बाजारात याचा परिणाम दिसून येत आहे. सध्या बाजारात मका सरासरी १७०० ते १९०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. मक्याची बाजारातील आवकही काहीशी सुधारलेली आहे. मक्याच्या भावात काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .लसणाला उठावबाजारात लसणाची आवक काहीशी मंदावली आहे. याचा आधार लसणाच्या भावाला मिळत आहे. लसणाला सध्या चांगला उठाव आहे. लग्नसराई आणि समारंभामुळे मागणी वाढली आहे. तर यंदा लसणाचे उत्पादन कमी झाल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. बाजारातील आवक मंदावल्यानंतर दरातही वाढ दिसून आली. सध्या लसूण ७ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान विकला जात आहे. लसणाची आवक पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही स्थिरावू शकतात, असा अंदाज लसूण बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.