Electricity Meter : महावितरणचे नवीन टीओडी मीटर; प्री-पेड नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञान

Maharashtra Electricity billing : नवीन वीजजोडणीसाठी तसेच सदोष व नादुरुस्त मीटर बदलताना आधुनिक तंत्रज्ञानाचे टीओडी वीजमीटर वीजग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.
Electricity
Electricity MeterAgrowon
Published on
Updated on

Pune News : नवीन वीजजोडणीसाठी तसेच सदोष व नादुरुस्त मीटर बदलताना आधुनिक तंत्रज्ञानाचे टीओडी वीजमीटर वीजग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत. हे मीटर प्रीपेड नाहीत. तर सध्याच्या मीटरप्रमाणे पोस्टपेड म्हणजेच वीज वापरानंतर दरमहा बिल या पद्धतीचे आहेत.

त्यामुळे सध्याच्या बिलिंग प्रणालीमध्ये कोणताही बदल होणार नाही. नव्या टीओडी मीटरमुळे ग्राहकांना त्यांचा वीजवापर नियमितपणे मोबाइलवर समजणार असून अचूक बिलिंग होईल. हे मीटर बसवून ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Electricity
PM Suryaghar Electricity Scheme: ‘सूर्यघर’ वीज योजनेत नागपूर, पुण्याची आघाडी

घरगुती वीजग्राहकांसाठी स्वस्त वीजदराच्या स्लॅबसाठी टीओडी (टाइम ऑफ डे) प्रणाली, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी नेटमीटरिंग, स्वयंचलित व अचूक मीटर रीडिंग तसेच वीजवापर किती झाला याची प्रत्येक मिनिटाला मोबाइलवर माहिती कळू शकेल अशा मुख्य सोयी या नव्या वीज मीटरमध्ये आहेत. महावितरणतर्फे बसविण्यात येणारे नवे टीओडी मीटर हे ग्राहकांना मोफत मिळत आहेत.

Electricity
Electric Bill Rate : महावितरणकडून दर कपातीचा प्रस्ताव; संचालक विश्वास पाठकांनी दिली माहिती

टीओडी मीटरमुळे वीजदरात सवलतीचा लाभ

विजेचे दर महावितरणकडून नव्हे, तर विद्युत नियामक आयोगाकडून जनसुनावणी घेऊन निश्‍चित केले जातात. कमी वीज वापरणाऱ्यांना कमी दर आणि जास्त वीज वापरणाऱ्या श्रीमतांना अधिक दर असे वीजदराचे सूत्र यापुढेही कायम राहणार आहे.

एप्रिल महिन्यापासून घरगुती ग्राहकांना टाइम ऑफ डे (टीओडी) प्रमाणे वीज दर लागू होणार आहे. महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीजदरनिश्चिश्‍चिती प्रस्तावात घरगुती ग्राहकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरल्यास सवलत देऊ केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com