Maharashtra Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Compensation : दुष्काळग्रस्तांना मदत कधी

Drought Update : राज्य सरकारने अद्याप दुष्काळग्रस्त भागातील बळीराजाला, नागरिकांना मदत दिली नाही

Team Agrowon

Pune News : राज्य सरकारने अद्याप दुष्काळग्रस्त भागातील बळीराजाला, नागरिकांना मदत दिली नाही. त्यांच्यापर्यंत दुष्काळग्रस्तांसाठीच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. याकडे सरकारचे लक्ष वेधत दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार, असा सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला.

सरकारने ४० तालुक्यांत आणि सुमारे १२०० महसूल मंडलांत दुष्काळ जाहीर केला आहे. पण, कुठलीही उपाययोजना या भागात अद्याप केलेली नाही आणि दुष्काळग्रस्तांना अद्याप आर्थिक मदतही दिली नाही. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे.

धंगेकर म्हणाले, ‘‘दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पॅकेज जाहीर करून त्यांना आर्थिक मदत द्यावी. शासकीय सुविधा तातडीने द्याव्यात. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. जनावरांना चारा देण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी.’’

‘‘जे सरकार जनतेचे प्रश्न सोडवते, शेतकऱ्यांच्या हाकेला ओ देत धावून जाते, ते सरकार खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार असते. पण, सध्याच्या सरकारला सर्वसामान्य लोकांकडे, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळच नाही,’’ अशी टीका धंगेकर यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT