Maharashtra Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : गिरणा पट्ट्यात दुष्काळी उपाययोजना केव्हा लागू होणार

Drought Update : गिरणा पट्ट्यात दुष्काळामुळे चार वर्षांनंतर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईने डोके वर काढायला सुरवात केली; तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : गिरणा पट्ट्यात दुष्काळामुळे चार वर्षांनंतर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईने डोके वर काढायला सुरवात केली; तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अत्यल्प पावसामुळे खरिपावर नांगर फिरलाच, त्याबरोबर रब्बीचीही दैना झाल्याचे चित्र आहे. मात्र, शासन दुष्काळसदृश तालुके घोषित करून मोकळे झाले. पण, उपाययोजनांचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

गिरणा धरण सलग चार वर्षे १०० टक्के भरल्याने गिरणा पट्ट्यात आबादानी होती. शेतशिवार हिरवाईने नाचत होते. मात्र, यंदा पाऊस दांडीयात्रेला गेल्याने खरिपाची अक्षरश: म्हसणवटी झाली; तर रब्बीचीही राख झाल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीच्या गर्तेत सापडला. शासनाने गिरणा पट्ट्यातील तिन्ही तालुके दुष्काळाच्या यादीत घेतले. मात्र, मदत आणि प्रत्यक्ष उपाययोजनांचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

खरिपात ६० टक्के घट

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामात उत्पादनात तब्बल ६० टक्के घट झाल्याचे पाहावयास मिळाले. एकरी सरासरी १० क्विंटल येणारा कापूस तीन ते चार क्विंटल आला. मक्याचे पीक तर आलेच नाही. हे कमी की काय, नंतरही पावसाने पाठ फिरविल्याने विहिरींनी आत्तापासून तळ गाठला आहे.

पर्यायाने रब्बी हंगामही कोलमडेल. गिरणा धरणाने जेमतेम पन्नाशी गाठली. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला. मात्र, रब्बीला कालव्याद्वारे एकही पाणी मिळणार नाहीये. त्यामुळे पाटाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्यांना मोठा फटका बसला आहे.

कापसाच्या दराबाबत कोणी बोलेना अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या उत्पन्नात ६० टक्के घट झाली आहे; तर दुसरीकडे जो कापूस घरात आला, त्यालाही योग्य दर मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूसकोंडी झाली. सात हजारांच्या वर भाव जायला तयार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT