Onion Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Crop Management : अवकाळीग्रस्त कांदा पिकात कोणते उपाय करायचे?

Team Agrowon

Onion Crop : सध्या बऱ्याच भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.

अवकाळी पावसामुळे कांदा रोपवाटीकेत आणि पुनर्लागवड केलेल्या कांदा पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहीले आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कांदा रोपवाटीकेत साठलेले पावसाचे पाणी निचरा करुन बाहेर काढाव. ढगाळ वातावरणामुळे हवेत आर्द्रतेच प्रमाण वाढलेल आहे. त्यामुळे कांदा रोपांची उभट वाढ झालेली आहे. आणि रोपांच्या बुंध्याची जाडीही कमी झालेली आहे. त्यामुळे रोपांच्या पातींना पीळ पडलेला दिसून येईल. याशिवाय पाणी साठून राहिल्यामुळे रोपांची मुळेही सडण्याच प्रमाण वाढेल. त्यामुळे कांदा रोपे सशक्त आणि मजबूत होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. यासाठी ००:५२:३४ हे विद्राव्य खत २ ग्रॅम अधिक सिलीकॉन १ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून एकदा किंवा दोनदा फवारणी करावी. तसेच विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणाची आळवणी करावी. 

करपा रोग आणि फुलकीडीचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर ...

कांदा रोपांवर करपा रोगाचा आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक लिटर पाण्यात एम -४५ दोन ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मिली घेऊन यामध्ये १ मिली स्टिकर मिसळून तयार केलेल्या द्रावणाची रोपावर फवारणी करावी.

कांदा रोपवाटीकेमध्ये ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल. 

आता पाहुया पुनर्लागवड झालेल्या कांदा  पिकाची कशी काळजी घ्यायची ते...

अवकाळी पावसामुळे नुकतीच पुनर्लागवड झालेल्या कांदा रोपांची मुळे सडण्याच प्रमाण वाढेल. याशिवाय पातींना पीळही पडलेला दिसून येईल. मध्यम ते भारी जमिनीतील वाफ्यात पाणी साठून राहिल्यामुळे रोपांची मर होऊ शकते. याशिवाय पावसामुळे जमिनीत दिलेल्या खतांचा पाण्याबरोबर निचरा झाला असेल.

त्यासाठी पिकाला नव्याने पुन्हा एकदा सुक्ष्म आणि मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा लागेल. त्यासाठी  लागवडीपुर्वी खते दिली नसतीलतर प्रती एकर १५ किलो युरिया अधिक २० किलो १०:२६:२६ अधिक पाच किलो सुक्ष्मअन्नद्रव्ये अधिक पाच किलो गंधक या खतांचा वापर करावा.

सिलिकॉन हे मुल्यद्रव्य फवारणीतून पिकाला द्यावे. सिलिकॉनमुळे कांदा रोपांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. याशिवाय पिकाची मुळे मजबूत होण्यास व मुळांची घनता वाढण्यास मदत होते. लागवडीनंतर १० दिवसांपर्यंत अझॅटोबॅक्टर, पीएसबी, प्रत्येकी दोन लिटर प्रती एकरी द्यावे. 

रापोंची मुळकूज आणि कंदकूज टाळायची असेल तर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक प्रत्येकी दोन लिटर प्रती एकरसाठी १० दिवसांच्या अंतराने दोन ते तीन दिवस द्यावे. आणि जर फुलकिडे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हेक्झाकोनॅझोल १ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मिली स्टिकरसर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा 

प्रोफेनोफॉस १ मिली किंवा लॅम्डासायहॅलोथ्रीन ३० टक्के ईसी ०.५ मिली अधिक स्टिकर १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. अशा प्रकारे अवकाळी पाऊस झालेल्या ठिकाणच्या कांदा लागवडीत उपाययोजना केल्यास होणार नुकसान कमी करता येईल.    

माहिती आणि संशोधन - डॉ. दत्तात्रय गावडे, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT