Job Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Job Reservation : प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीतील आरक्षणाबाबत भूमिका काय?

Project Victims : प्रकल्पग्रस्तांना नोकरीत आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : प्रकल्पग्रस्तांना नोकरीत आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना याप्रकरणी पुढील सुनावणीत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना राज्य शासनाच्या पुनर्वसन कायद्यानुसार नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे, अशी विनंती करणारी याचिका संतोष तुलसीराम चुटे यांच्यातर्फे दाखल करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष याप्रकरणी सुनावणी झाली. प्रकल्पग्रस्तांना शासकीय वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील नोकरभरतीत ५ टक्के आरक्षण देणारी जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान ही बाब केवळ गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांपुरती मर्यादित नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. ही जनहिताची मागणी आहे. त्यामुळे न्यायालयाने या याचिकेचे जनहित याचिकेमध्ये रूपांतर करण्याचे आदेश दिले.

याचिकाकर्त्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सामान्य प्रशासन विभागाला प्रतिवादी करण्यास सांगितले आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांना नोकरीत आरक्षण देण्याबाबत मुख्य सचिवांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. अनिल ढवस, ॲड. कौस्तुभ भिसे यांनी बाजू मांडली. राज्य शासनातर्फे ॲड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Urban Issues: शहरातील नागरी समस्यांकडे मनपाने गंभीरपणे द्यावे लक्ष

Kharif Rain: पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज

Artificial flowers: कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालावी

Agrowon Podcast: पपई दर टिकून; आले चढ-उतारात, काकडीला उठाव, उडीद व कापूस दर दबावात

SCROLL FOR NEXT