Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Water Storage : खानदेशात जलसाठा स्थिर

Water Stock : जळगाव जिल्ह्यातील रावेरातील मंगरूळ, सुकी यावलमधील गारबर्डी प्रकल्पात जलसाठा बरा आहे. तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर प्रकल्पात आवक सुरू असल्याने त्यातून विसर्ग सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस नाही. पण पाणीवापर सध्या शिवारात सिंचनासाठी मर्यादित असल्याने जलसाठा स्थिर आहे. पश्चिम भागातील प्रकल्प कोरडेच आहेत. गिरणा धरणात सुमारे ५४ टक्के जलसाठा आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेरातील मंगरूळ, सुकी यावलमधील गारबर्डी प्रकल्पात जलसाठा बरा आहे. तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर प्रकल्पात आवक सुरू असल्याने त्यातून विसर्ग सुरू आहे. गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणात ५४ टक्के जलसाठा आहे. यावलमधील मोर, चोपड्यातील गूळ प्रकल्पातील साठाही बरा किंवा ६५ टक्क्यांवर आहे. जामनेरनजीकच्या वाघूर प्रकल्पातील साठाही ६५ टक्के एवढा आहे.

त्यात हवा तेवढा साठा आहे. त्यातून जळगाव व जामनेर शहर, औद्योगिक संस्थांनाही पाणी दिले जाते. यामुळे हा प्रकल्प १०० टक्के भरण्याची अपेक्षा आहे. पाचोरा तालुक्यातील अग्नावती, बहुळा, एरंडोलातील अंजनी, चाळीसगावमधील मन्याड, पारोळ्यातील बोरी प्रकल्पात जलसाठा अल्प आहे. धुळ्यातील बुराई, पांझरा, सोनवद हे प्रकल्प भरलेले नाहीत.

पण साक्रीमधील जामखेली व पांझरा प्रकल्पातील जलसाठा मुबलक आहे. जामखेली प्रकल्प मागील आठवड्यातच १०० टक्के भरला आहे. तसेच अमरावती व इतर दोन प्रकल्पातही जलसाठा बरा आहे. शिरपुरातील अनेर प्रकल्पात जलसाठा मुबलक आहे. नंदुरबारमधील दरा, सुसरी हे प्रकल्पही भरलेले नाहीत. पण नंदुरबारातील एकूण जलसाठा ५० टक्क्यांवर पोचला आहे. तापी नदीवरील प्रकाशा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

पश्चिम भागात जोरदार पावसाची गरज

खानदेशात मागील २० ते २५ दिवसात काही भागात बरा व काही भागात कमी पाऊस झाला आहे. इतर भागात मध्यम पाऊस व उकाडा, वारा अशी स्थिती आहे. जोरदार पाऊस कुठेही अपवाद वगळता झालेला नाही. जळगाव जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरदार पावसाची गरज आहे. कारण या भागात जलसाठा कमी आहे. रावेर, यावल, अमळनेरात पावसाची मोठी तूट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Viral Video : राज्यातील शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी

Onion Procurement Scam : कांदा खरेदी केंद्रांवर नियंत्रणासाठी राज्य सरकारची दक्षता समिती

Urea Shortage : युरियाची खानदेशात टंचाई

Maharashtra Assembly Session : बोजाखाली दबलेल्या सरकारची सुटका

MGNREGA Scam : मजुरांच्या खात्यात पैसे टाकणारे चौघे अटकेत

SCROLL FOR NEXT