Marathwada Water Storage : मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर

Jaykwadi Dam Water Level : सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्प २९.६६ टक्के म्हणजे २२.७३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती :

  1. एकूण पाणीसाठा ३५.११% – मराठवाड्यातील अकरा प्रमुख प्रकल्पांमध्ये मिळून सध्या १२६.७० टीएमसी पाणी आहे, त्यापैकी ६५.१९ टीएमसी उपयुक्त साठा आहे.

  2. जायकवाडी प्रकल्पात २९.६६% साठा – सध्या २२.७३ टीएमसी उपयुक्त पाणी असून, गोदावरी नदीपात्रातून नाशिक-नगरकडून पाण्याची नियमित आवक सुरू आहे.

  3. इतर प्रकल्पांची स्थिती संमिश्र – काही धरणांत पाणी कमी असून, उदा. मांजरा (१.७५ टीएमसी), माजलगाव (१.३५ टीएमसी), तर काहीत थोडा जास्त साठा जसे पैनगंगा (१४.७१ टीएमसी) आहे.

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा ३५. ११ टक्क्यांवर आला आहे. सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्प २९.६६ टक्के म्हणजे २२.७३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. माहितीनुसार जायकवाडी प्रकल्पात शुक्रवारी (ता. २०) सकाळी सहा वाजताच्या सुमारास २९२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

पावसाचा जोर वाढल्याने इथून पुढील काळात प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची आशा आहे. मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये १२६.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ज्यामध्ये सरासरी ६५.१९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. जायकवाडी प्रकल्पात आत्ताच्याघडीला ४८.७९७ टीएमसी पाणी साठा झाला आहे.

Dam Water Storage
Water Storage : धाराशिवमध्ये प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ

त्यापैकी सुमारे २२.७३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीत पाण्याची आवक होऊ शकणाऱ्या नाशिक,नगर भागातील पावसामुळे जायकवाडीकडे पाण्याची आवक वाढेल अशी आशा आहे. नाशिक, नगर भागातील प्रकल्पापैकी दारणा प्रकल्पातून शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ४७४२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

त्यापाठोपाठ गंगापूरमधून ५७० क्यूसेक, कडवामधून ५३० क्युसेक, पालखेड मधून ३२४० क्युसेक तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून २२ हजार ३४५ क्युसेकने जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. निम्न पूर्ण प्रकल्पात ६.७४८ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी ३.१३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

येलदरी प्रकल्पात १८.६८२ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून त्यापैकी ४९.९४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सिद्धेश्वर प्रकल्पात ६.५५७ टीएमसी एकूण पाणीसाठा तर २०.२० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. माजलगाव प्रकल्पात ६.३६७ टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी १.३५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Dam Water Storage
Khandesh Water Storage : खानदेशात जलसाठा वाढू लागला

मांजरा प्रकल्पात ३.४१२ टीएमसी एकूण पाणीसाठा असून त्यापैकी १.७५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. पैनगंगा प्रकल्पात २५.८२८ टीएमसी एकूण पाणीसाठा असून त्यापैकी १४.७१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. मानार प्रकल्पात २.७७९ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून त्यापैकी २.४७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

प्रकल्पात ३.३१९ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून त्यापैकी २.२६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. निम्न तेरणा प्रकल्पात ०.७७३ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून त्यापैकी ०.६८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सीना कोळेगाव प्रकल्पात ३.४१८ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून त्यापैकी १.२६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा, असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  1. सध्या मराठवाड्यातील एकूण पाणीसाठा किती आहे?
    ➤ १२६.७० टीएमसी, त्यापैकी ६५.१९ टीएमसी उपयुक्त आहे.

  2. जायकवाडी धरणात किती टक्के पाणी आहे?
    ➤ जायकवाडीत सध्या २९.६६ टक्के पाणी साठा आहे.

  3. जायकवाडीत पाण्याची आवक कुठून होते आहे?
    ➤ नाशिक व नगर जिल्ह्यातील प्रकल्पांमधून गोदावरी नदीमार्गे पाण्याची आवक होते आहे.

  4. मराठवाड्यात कोणत्या प्रकल्पात सर्वाधिक उपयुक्त पाणी साठा आहे?
    ➤ पैनगंगा प्रकल्पात १४.७१ टीएमसी उपयुक्त साठा आहे.

  5. पावसामुळे धरणांचा साठा वाढण्याची शक्यता आहे का?
    ➤ होय, पावसाचा जोर कायम राहिल्यास आवक वाढून साठाही वाढू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com