Well Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Well Subsidy : विहिरींचे अनुदान वर्षभरापासून थकित

Agriculture Irrigation Scheme : शेतीला सिंचनाची सोय व्हावी, गावातील मजुरांना गावातच काम मिळावा या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपये किमतीची सिंचन विहीर बांधकामाची योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू आहे.

Team Agrowon

Chandrapur News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला सिंचन विहीर ही योजना राबविली जाते. योजनेतून अनेक शेतकऱ्यांनी विहिरींचे बांधकाम केले. मात्र, त्याचा निधी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कर्ज काढून विहिरीचे बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम देतादेता नाकीनऊ येत आहे.

शेतीला सिंचनाची सोय व्हावी, गावातील मजुरांना गावातच काम मिळावा या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपये किमतीची सिंचन विहीर बांधकामाची योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू आहे.

या योजनेतर्गत पांदण रस्ते, तलाव, बोडी अशी सार्वजनिक तर सिंचन विहीर, गुरांचा गोठा, शौचालय, शोषखड्डे हे वैयक्तिक लाभाची कामे करण्यात येतात. २०२४-२५ या सत्रात सावली तालुक्यात १३९ विहिरींचे बांधकाम जानेवारी ते जून या कालावधीत झाले.

या योजनेअंतर्गत अकुशलचे अनुदान मजुरांच्या खात्यात तर कुशलची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते. एकूण चार लाख अनुदानापैकी मजुरी १ लाख ४७ हजार तर उर्वरित रक्कम साहित्यासाठी दिल्या जाते. सिंचन विहिरीचे अनुदान सरळ बँक खात्यात शासनाकडून जमा केल्या जाते. काही लाभार्थ्यांच्या विहीर बांधकामाची हजेरी पुस्तकात नोंद न केल्याने मजुरीपासूनही वंचित आहेत.

विहिरीचे बांधकाम झाल्यानंतर कुशल मजुरीची रक्कम १३९ लाभार्थ्यांपैकी फक्त ५९ लाभार्थ्यांना मिळाली तर अजूनही एका वर्षापासून ८० लाभार्थ्यांना रक्कम मिळाली नाही. शेतकऱ्यांनी आपल्याकडील रक्कम खर्च करून बांधकाम साहित्य उधारीवर घेतले. काहींनी कर्ज काढून विहिरीचे बांधकाम केले. मात्र अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.

मार्च २०२४ पूर्वी माझ्या विहिरीचे बांधकाम झाले. मजुरांना नगदी रक्कम देऊन व दुकानदाराकडून साहित्य उधारीवर घेऊन बांधकाम केले. फक्त मजुरीची रक्कम मिळाली. पण उर्वरित साहित्याची रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही. शेतीचा हंगाम असून शेती कशी करावी हा प्रश्न सतावत आहे.
- गुरुदेव भुरसे, लाभार्थी, केरोडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amul Dairy AI Project : 'अमूल'चा दुध उत्पादकांसाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता' आधारित प्रकल्प; ३६ लाख कुटुंबांना मिळणार लाभ

Tamil Nadu: तामिळनाडूतील निवडणुकीपूर्वी स्टॅलिन सरकारचा मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात ५ हजार जमा

Satara DPDC Meeting: साताऱ्यासाठी ३४६ कोटींच्या वाढीव निधीची मागणी

Chandrapur Mayor Election: चंद्रपूरसंदर्भात ‘उबाठा’ची भूमिका चुकीचीच

Orange Crop Loss: संत्रा उत्पादकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

SCROLL FOR NEXT