Weed Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Weed Management : तणांचा प्रादुर्भाव चिंताजनक ; देशात ७० हजार कोटींचे पीक नुकसान

Crop Loss Due To Weed : पिकातील तणांचा प्रादुर्भाव अभ्यासण्यासाठी देशभरात सुमारे १६०० प्रात्यक्षिक घेण्यात आले. धान, बाजरा, गहू, मका, ज्वारी याप्रमाणे दहा पिकांचा त्यामध्ये समावेश होता.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : पिकातील तणांचा प्रादुर्भाव अभ्यासण्यासाठी देशभरात सुमारे १६०० प्रात्यक्षिक घेण्यात आले. धान, बाजरा, गहू, मका, ज्वारी याप्रमाणे दहा पिकांचा त्यामध्ये समावेश होता. अभ्यासाअंती वर्षभरानंतर मांडण्यात आलेल्या निष्कर्षात तणांमुळे तब्बल ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले. त्यामुळे पिकातील तण नियंत्रण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर असल्याची माहिती जबलपूर येथील तण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. जे. एस. मिश्रा यांनी दिली.

डॉ. मिश्रा यांच्या माहितीनुसार, जबलपूर (मध्य प्रदेश) येथे तण संशोधन केंद्राची स्थापना १९८९ मध्ये करण्यात आली. या केंद्राच्या अंतर्गत देशभरात २४ अखिल भारतीय समन्वित संशोधन उपकेंद्र आहेत. डॉ. मिश्रा सांगतात, कोठेही सहज उगवते म्हणून त्याला आपण निरुपयोगी ठरवत तण म्हणतो. तरी ते रोप असून काहींसाठी या तण रुपी रोपांचा आयुर्वेदीय उपयोग असू शकतो. याउलट पीक पेरणाऱ्यांसाठी ते निरुपयोगी असू शकते.

जलकुंभी, सेल्वेनिया या पाण्यातील तणांचे परिणाम देशभरात दिसत आहे. अमरवेलची विदर्भात प्रमुख समस्या आहे. तणाची मुळे खोलवर रुजतात त्यामुळे त्यांना पाणी मिळते, परिणामी ते उन्हाळ्यात देखील तग धरतात. त्यावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील होत नाही, असेही निरीक्षण आहे.

कोणतेच पीक नसले अशावेळी काही किडी तणावर वाढतात. पीक लागवडीनंतर त्या पिकावर हल्ला करतात. त्यामुळेच गाजर गवताच्या संपर्कात आलेल्या जनावरांना त्वचारोग होण्याची समस्या निर्माण होते. लॅंटाना कॅमरा, प्राथेनियम या वर्गातील तण तर पिकाला वाढूच देत नाही, असे निरीक्षण असल्याचे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

‘एचटीबीटी’मुळे सुपरवीडचा धोका

ट्रान्सजेनिक जीव म्हणजे त्यांच्या जिनोममध्ये दुसऱ्या प्रजातींमधून परदेशी ‘डीएनए’ अनुक्रम आणून बदल केला जातो. एचटीबीटी असे तंत्रज्ञान आहे. परंतु हा जीन पुढे परागीकरण व इतर माध्यमातून तणात शिरला तर सुपरवीड तयार होईल. त्यावर तणनाशक देखील प्रभावी ठरणार नाही, अशी भीती डॉ. मिश्रा यांनी व्यक्‍त केली.

तरच तणनाशक ठरेल प्रभावी

योग्य वेळ, तणनाशकाचे योग्य प्रमाण, योग्य फॉर्म्यूलेशन, फवारणीकामी विशेष नोझलचा वापर या बाबी तणनाशक फवारणीसाठी पूरक ठरतात. याकडे लक्ष्य दिले तर पर्यावरणाचे नुकसानही कमी होते. नजीकच्या काळात सुपरवीडची समस्या गंभीर होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तणनाशक फेरपालटावर भर दिला पाहिजे. एकाच तणनाशकाचा वापर करू नये, अशी शिफारस आहे. तणनाशकासोबत इतर पर्यायाचा अवलंब होण्याची गरज आहे. कापसाच्या लागवडीनंतर दोन ते तीन दिवसांत त्यासोबचत २०-२५ दिवसांनंतर फवारणीची शिफारस असलेले तणनाशक आहेत.

वातावरणातील बदलाच्या पार्श्‍वभूमीवर तणाची वाढ अधिक प्रमाणात होत असल्याचे निरीक्षण आहे. तणांच्या पानावर एक विशिष्ट प्रकारचा वॅक्‍स असतो. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. त्यामुळेच याला पाण्याची गरज कमी राहते. देशात ७० पेक्षा अधिक तणनाशक असून ते विविध पिकांसाठी शिफारशीत आहेत.
- डॉ. जे. एस. मिश्रा, संचालक, तण संशोधन केंद्र, जबलपूर, मध्य प्रदेश

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: दांगट समितीकडून गैरव्यवहारांची चौकशी नको

China Fertilizer Ban: चीनकडून खत निर्यात थांबल्याने उद्योगांवर परिणाम निश्चित

Aashadhi Wari 2025: संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या वेशीवर

Gujrat Onion Farmers: गुजरातच्या कांदा उत्पादकांना क्विंटलमागे २०० रुपयांची मदत

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ रद्द करण्याची सरकारला सद्‌बुद्धी दे

SCROLL FOR NEXT