Weather Update agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : थंडीचा जोर वाढला, रब्बीला पोषक हवामान, आणखी किती दिवस थंडी राहणार?

Maharashtra Cold : राज्यात पडलेल्या थंडीने रब्बीच्या पिकांना पोषक हवामान मिळत असल्याने शाळू, गहू आणि हरभरा पिके जोमदार वाढत आहेत.

sandeep Shirguppe

Weather Update Cold : यंदा पाऊस कमी झाल्याने थंडीही कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. दरम्यान पाऊस कमी झाला असला तरी थंडी मात्र जोरदार पडली आहे. राज्यात पडलेल्या थंडीने रब्बीच्या पिकांना पोषक हवामान मिळत असल्याने शाळू, गहू आणि हरभरा पिके जोमदार वाढत आहेत.

तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी पारा १७ अंशांपर्यंत खाली आला होता. आणखी काही दिवस हुडहुडी कायम राहणार असून, पारा १६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मागच्या आठवड्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब होऊन उन्हाचे चटके बसणार का अशी स्थिती असताना अचानक जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून जोर धरला आहे. दुपारी ऊन आणि सायंकाळनंतर गारठा असे वातावरण आहे.

यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडी म्हणावी तशी नव्हती परंतु डिसेंबर महिन्यात काही अंशी थंडी पडली यानंतर मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. ही थंडी आणखी पाच-सहा दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात वाढ होऊन पारा ३२ अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात थंडीची लाट

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीची लाट सुरू झाली असून, किमान तापमानाचा पारा सातत्याने घट होत आहे. बुधवारी जळगावमध्ये राज्यात सर्वात कमी म्हणजे ९.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यात आणखी थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

उत्तर भारतही गारठला

उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून तीव्र थंडीची लाट आली आहे. विशेषतः, दिल्ली, बिहार, पंजाब, राजस्थान, झारखंड या राज्यांसह ईशान्य भारतातील राज्यांतदेखील जोरदार थंडी आहे. काही भागांत पारा २अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. शिवाय, दाट धुके पसरले आहे. या भागांकडून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. परिणामी, राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागांत थंडीची लाट सुरू आहे. बहुतांश राज्याच्या किमान तापमानाचा पारा घसरला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

Agriculture Irrigation Scheme: शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

Post-Harvest Packaging : किरकोळ ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहोचविण्यासाठी पॅकेजिंग

Orchard Farming : नवीन फळझाडांची रोपे, कलमांची निवड

Herbal Processing Business : कोकणात सुगंधी, वनौषधींपासून तेल, पावडर निर्मिती

SCROLL FOR NEXT