International Organic Postgraduate Diploma Course : सेंद्रिय पदव्युत्तर पदविकेची पहिली तुकडी पडली बाहेर

Organic Farming : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि इकोसर्ट (फ्रान्स) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सेंद्रिय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला असून, या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी बाहेर निघाली आहे.
International Organic Postgraduate Diploma Course
International Organic Postgraduate Diploma CourseSAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
PDKV, Akola अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि इकोसर्ट (फ्रान्स) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सेंद्रिय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला असून, या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी बाहेर निघाली आहे. या तुकडीतील विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी माजी कुलगुरू तथा सेंद्रीय शेती विषयातील ज्येष्ठ तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. विलास भाले यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी कुलगुरू डॉ.शरद गडाख अध्यक्षस्थानी होते.
या वेळी डॉ. भाले म्हणाले, की प्रगत कृषी तंत्रज्ञानाच्या सहयोगातून आपल्या देशाने अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ केली असून, बदलत्या परिस्थितीनुरूप सेंद्रिय घटकांच्या प्रभावी वापरासह विषमुक्त अन्नधान्य निर्मिती काळाची गरज बनली आहे.

विषमुक्त अन्नधान्य उत्पादनासह सेंद्रिय निविष्ठांचे प्रमाणीकरण तथा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विपणन व्यवस्थापन आत्मसात करण्याची आवश्यकता व्यक्त केली. सेंद्रिय निविष्ठांच्या उत्पादनात देशाने आघाडी घेतली असून त्यांचे बाजारमूल्य देखील अधिक असून, या विषयात सेंद्रिय प्रमाणीकरण पदविकाधारकांना मोठ्या प्रमाणात वाव असून त्यांचे भविष्य देखील उज्ज्वल असल्याचे ते म्हणाले.

International Organic Postgraduate Diploma Course
Organic Certification Course : सेंद्रीय प्रमाणीकरण अभ्यासक्रमाला वाढती मागणी

अध्यक्ष डॉ. गडाख म्हणाले, की शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विषमुक्त अन्नधान्य निर्मिती सुकर झाली असून, सेंद्रिय प्रमाणीकरण विषयातील पदविकाधारकांना सेंद्रिय निविष्ठांच्या प्रमाणीकरणासह मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

येत्या काळात शेतमाल निर्यातीतून अधिक आर्थिक सक्षमतेकडे आपल्या देशाची आगेकूच झालेली पाहायला मिळेल असा आशावाद व्यक्त केला.

कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या या प्रमाणपत्र प्रदान समारंभाला शिक्षण संचालक डॉ. श्यामसुंदर माने, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, इकोसर्ट इंडियाचे विभागीय व्यवस्थापक मुकेश अपचंदा,

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचे प्रकल्प संचालक संतोषकुमार आळसे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, कुलसचिव सुधीर राठोड, कृषी विद्या विभागाचे प्रमुख तथा कोर्स डायरेक्टर डॉ. आदिनाथ पसलावार यांची उपस्थिती होती.

डॉ. पसलावार यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. माने यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी मुकेश अपचंदा, डॉ. मुरली इंगळे, संतोष आळशे यांनी विचार मांडले. विद्यार्थ्यांमधून सचिन मताळे व सुब्बाराम रेड्डी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उपस्थित ३० पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

अभ्यासक्रमाचे विषयतज्ज्ञ प्रा. डॉ. नीरज सातपुते, डॉ. सुरेंद्र देशमुख, डॉ. किशोर बिडवे, डॉ. योगेश इंगळे, डॉ. परीक्षित शिंगरूप, डॉ. आम्रपाली आखरे, डॉ. नितीन कोंडे, डॉ. हर्षवर्धन देशमुख यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन कोंडे यांनी केले. तर डॉ. किशोर बिडवे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com