Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Insurance : सात फळपिकांना हवामानावर आधारित विमा योजना लागू

PM Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना (२०२४-२५) मृग बहारासाठी परभणी जिल्ह्यातील संत्रा, लिंबू, पेरू, मोसंबी, चिकू, डाळिंब, सीताफळ या ७ फळपिकांना लागू आहे.

Team Agrowon

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना (२०२४-२५) मृग बहारासाठी परभणी जिल्ह्यातील संत्रा, लिंबू, पेरू, मोसंबी, चिकू, डाळिंब, सीताफळ या ७ फळपिकांना लागू आहे.

संत्रा, पेरू, लिंबू या फळपिकांचे विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मंगळवार (ता. २५) अखेरची मुदत आहे. मोसंबी, चिकूसाठी ३० जून पर्यंत, डाळिंबासाठी १४ जुलै तर सिताफळासाठी ३१ जुलै पर्यंत विमा प्रस्ताव व सादर करता येतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी यांनी दिली.

केवळ उत्पादनक्षम फळपिकांसाठी या योजनेअंतर्गंत विमा संरक्षणाचे कवच लागू आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विहित मुदतीत बॅंका, आपले सरकार सेवा केंद्र यांच्या मार्फत विमा प्रस्ताव सादर करता येतील. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग किंवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एका हंगामाकरिता विमा संरक्षण घेता येईल.

मृग बहारासाठी जास्तीजास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, राष्ट्रीयकृत बॅंका यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी यांनी केले आहे.

फळपिके...विमा योजनेत समाविष्ट महसूल मंडळे

संत्रा : पेडगाव, जांब, टाकळी कुंभकर्ण, जिंतूर, बोरी, सावंगी म्हाळसा, आ़़डगाव, सेलू, वालूर, देऊळगाव गात, कुपटा, मानवत, कोल्हा, केकरजवळा, ताडबोरगाव, पाथरी, पूर्णा, चुडावा, कात्नेश्वर, ताडकळस, लिमला, कावलगाव.

लिंबू : दैठणा, सिंगणापूर, सेलू, वालूर, चिखलठाणा, देऊळगाव गात, कुपटा, मोरेगाव,

पाथरी, हदगाव बुद्रुक, बाभळगाव, आवलगाव, शेळगाव, वडगाव, माखणी, पूर्णा.

पेरू : परभणी ग्रामीण, झरी, टाकळी कुंभकर्ण, सेलू, वालूर, मोरेगाव, हदगाव बुद्रुक, वडगाव.

चिकू : टाकळी कुंभकर्ण, पूर्णा.

मोसंबी : परभणी, झरी, जिंतूर, बोरी, सेलू, वालूर, कुपटा, मोरेगाव, मानवत, केकरजवळा, कोल्हा, पाथरी, हदगाव बुद्रुक, पूर्णा चुडावा, लिमला, कावलगाव.

डाळींब : चारठाणा, आडगाव, सेलू.

सीताफळ : पेडगाव, जांब, जिंतूर, बामणी, सेलू, वालूर, मोरेगाव, ताडबोरगाव, गंगाखेड, माखणी, महातपुरी, राणीसावरगाव, पिंपळदरी, चुडावा.

फळ पिकनिहाय विमायोजना स्थिती ( प्रतिहेक्टरी विमा हप्ता)

फळपिक शेतकरी विमा हप्ता प्रस्ता अंतिम तारिख

संत्रा ५००० २५ जून २०२४

लिंबू ४५०० २५ जून २०२४

पेरू ३५०० २५ जून २०२४

मोसंबी ५००० ३० जून

चिकू .३५०० ३० जून

डाळिंब .८००० १४ जुलै

सीताफळ ३५०० ३१ जुलै

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT