Pomegranate Farming : डाळींब बागेत बहारनिहाय कामकाजावर भर

Pomegranate Orchards : नारायण गुरुसिद्ध चौगुले १९९४ पासून डाळिंबाची शेती करत आहेत. पहिल्या वर्षी डाळिंबाच्या गणेश वाणाची १५० झाडांची लागवड करत डाळिंब शेतीला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे सुमारे १० एकरांपर्यंत डाळिंब क्षेत्र विस्तारले आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon
Published on
Updated on

नारायण चौगुले

Pomegranate Planting : दो ड्डी (ता. दक्षिण सोलापूर) येथे नारायण गुरुसिद्ध चौगुले यांची १६ एकर शेती आहे. सिंचनासाठी दोन विहिरी आणि दोन बोअरवेल आहेत. मात्र त्यास जेमतेम असून त्यावरच सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाते. नारायणराव यांनी १६ एकरांपैकी १० एकरावर डाळिंब लागवड केली आहे. उर्वरित क्षेत्रावर तूर, हरभरा, ज्वारी इत्यादी पिके घेतात. ते १९९४ पासून डाळिंबाची शेती करत आहेत. पहिल्या वर्षी डाळिंबाच्या गणेश वाणाची १५० झाडांची लागवड करत डाळिंब शेतीला सुरुवात केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लागवड क्षेत्रात वाढ करत नेली. आज त्यांच्याकडे सुमारे १० एकरांपर्यंत डाळिंब क्षेत्र विस्तारले आहे. सध्या बागेत अर्लीची ६५० झाडे, गणेश वाणाची ४०० झाडे आणि भगवा वाणाची २००० हजार झाडे आहेत. दरवर्षी बागेत प्रामुख्याने मृग आणि हस्त हे दोन बहार धरले जातात. दोन्ही बहाराचे हंगामनिहाय नियोजन केले जाते.

बहार नियोजन

यावर्षी पाऊस कमी झाला आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने त्याचा डाळिंब लागवडीवर परिणाम झाला आहे. विशेषतः डाळिंबाच्या फुगवणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा एकूण उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. दरवर्षी बागेतून एकरी सरासरी ५ ते ७ टन उत्पादन मिळते. मात्र यंदा एकरी उत्पादनात १ ते २ टनाचा फरक पडण्याची शक्यता आहे.

यावर्षी दहा एकरांपैकी सहा एकरावर मृग बहार तर ४ एकरांतील बागेत हस्त बहर धरला आहे. मृग बहाराच्या डाळिंबाची पानगळ मे महिन्यामध्ये तर हस्त बहरासाठी एक ऑगस्टला पानगळ केली आहे.

Pomegranate
Water Scarcity : पुणे विभागात नोव्हेंबरमध्येच पाणीटंचाईला सुरुवात

मृग बहाराचे नियोजन

साधारण सहा एकरावर मृग बहार धरला आहे.

मे महिन्यात पानगळ करून घेतली आहे.

आत्तापर्यंत बागेत वेळापत्रकानुसार सर्व कामे व्यवस्थित केली आहे.

संतुलित प्रमाणात रासायनिक खतांचा वापर आणि सिंचन व्यवस्थापनावर विशेष भर दिला आहे.

सध्या बागेतील झाडांना चांगल्या आकाराची आणि वजनाची काढणीयोग्य फळे लागलेली आहेत. येत्या पंधरवड्यात फळांची काढणी सुरु होईल.

एका डाळिंब फळाचे वजन साधारणपणे २०० ग्रॅम ते ३०० ग्रॅमपर्यंत आहे.

सध्या ठिबकद्वारे ००:००:५० या विद्राव्य खताचा डोस प्रति एकर ५ किलो प्रति आठवडा प्रमाणे देत आहे.

त्याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्य दर आठ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे दिला जात आहे.

सध्या थंडीचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. दिवसा कडाक्याचे ऊन पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा विचार करून गरजेनुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या फवारणी घेतल्या जात आहेत.

तसेच वाढत्या थंडीमुळे फळे तडकण्याची शक्यता असते. त्यासाठी चिलेटेड कॅल्शिअम आणि बोरॅान यांची प्रति लिटर एक ग्रॅम प्रमाणे दहा दिवसातून एकदा फवारणी केली जात आहे.

दर पंधरवड्याला जीवामृताचा एक डोस ठिबकमधून सोडला जातो.

पाणी नियोजनामध्ये बागेला एक दिवसाआड अडीच ते तीन तास पाणी ठिबकद्वारे दिले जाते.

Pomegranate
Cooperative Department : अवैध धान्य खरेदीविरोधात सहकार विभागाचे धाडसत्र

हस्त बहार नियोजन

हस्त बहाराच्या डाळिंब बागेची एक ऑगस्टला पानगळ करून घेतली आहे.

पानगळी करून आता तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

सध्या बागेत फळांचे चांगले सेटिंग झाले आहे. साधारण लिंबू आकाराएवढी फळे झाली आहेत.

बागेतील झाडांना ठिबकद्वारे १०ः२०ः२० या विद्राव्य खताची आठवड्याला ५ किलोप्रमाणे एकरी मात्रा देत आहे.

तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये सात लिटर प्रमाणे ठिबकमधून दर आठवड्याला प्रति एकर प्रमाणात दिली जात आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या दर दहा दिवसांनी आलटून-पालटून फवारणी केली जात आहे. त्याशिवाय दर पंधरवड्याला जैविक घटकांचा वापरही केला जात आहे. दर पंधरा दिवसांनी ठिबकद्वारे जीवामृताचा एक डोस दिला जात आहे.

आगामी नियोजन

मृग बहाराच्या बागेतील फळांची येत्या पंधरवड्यात काढणी सुरू होईल. दरांचा अंदाज घेऊन जागेवरच व्यापाऱ्याला बाग दिली जाईल.

सध्या मृग बहराच्या बागेत विशेष कोणती कामे करावयाची आवश्यकता नाही. फक्त नियमित सिंचनावर भर दिला जाईल.

हस्त बहारातील बागेत तणनियंत्रण करून बागेची स्वच्छता केली जाईल. पुढील आठवड्यात वातावरणाचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातील.

नारायण चौगुले, ८२७५२०६१८९ (शब्दांकन : सुदर्शन सुतार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com