Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

Indian Farmer : शेतकऱ्याला उपासमार, कर्जबाजारीपणा, दुष्काळ, अतिवृष्टी या चक्रातून वाचवण्यात हल्लीच्या काळातल्या सरकारला फारसं यश आलेलं नाहीये.

Team Agrowon

Indian Agriculture : स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी “जय जवान, जय किसान” हा नारा देऊन देशाच्या यंत्रणेत शेतकरी आणि सैनिकांचं मोठं महत्त्व असल्याचं स्पष्ट केलं होतं. युद्ध तसंच नंतरच्या दुष्काळातही शेतकऱ्यांनी अत्यंत निष्ठेने आपलं काम केलं आणि देशाला उपासमारीच्या खाईत जाण्यापासून वाचवलं.

परंतु शेतकऱ्याला उपासमार, कर्जबाजारीपणा, दुष्काळ, अतिवृष्टी या चक्रातून वाचवण्यात हल्लीच्या काळातल्या सरकारला फारसं यश आलेलं नाहीये. या चक्रात आजचा शेतकरी पिळून निघतोय. त्याने पिकावलेल्या धान्याला योग्य तो भाव मिळत नाही. पण महाराष्ट्रात असा एक नेता आहे ज्याने जो शेतकऱ्यांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिलाय. स्वतःच्या शेतात तो राबलाय, प्रचंड कष्टांनी तो वर आलाय आणि आपल्यासोबतच्या शेतकऱ्यांना हे कष्ट सोसावे लागू नयेत यासाठी तो झटतोय. ते म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले.

मूळचे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नाना पटोले यांचे वडील फाल्गुनराव पटोले कृषी अधिकारी होते. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच शेत तसंच शेतीशी संबंधित कामांशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध होता. त्यांनी स्वतःही शेतात अनेक वर्षं काम केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अन्न पिकवायला लागणारी मेहनत, वातावरणामुळे पिकाची होणारी नासाडी, दुष्काळ या सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवलेल्या आहेत.

शेतकऱ्याला राजकारणात सतत डावललं जातं, त्याला न्याय मिळायला वेळ लागतो. त्यांच्यासाठी योग्य ते कायदे राबवले जात नाहीत अश्या शेतकाऱ्यांसंदर्भातील अनेक गोष्टी नानाभाऊंनी स्वतः अनुभवल्या आहेत. त्यामुळेच याविरोधात आवाज उठवण्यासाठी ते शेतकऱ्यांची ढाल होऊन उभे राहतात व येणाऱ्या प्रत्येक समस्येला तोंड देतात. नानाभाऊंना राजकारणाचा वारसा लाभलेला नाही. त्यांच्या वडिलांना राजकारणाचा तिटकारा होता. या क्षेत्रात भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप आहे असं त्यांचं मत होतं.

त्यामुळे बराच काळ नानाभाऊदेखील राजकारणापासून दूर होते. परंतु एकदा त्यांनी पिकावलेल्या ऊसाला फॅक्टरीतून मंजूरी मिळाली नाही. तो ऊस पेटवून देण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा मार्ग न्हवता. आपण स्वतः कष्टाने पिकवलेला ऊस पेटताना बघून नानाभाऊंच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. त्याच क्षणी त्यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढायचं ठरवलं. “फक्त लांब बसून चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, आपण स्वतः या क्षेत्रात उतरून काम केलं पाहिजे आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या पाठिंब्याने मी राजकारणात आलो,” असं ते आवर्जून सांगतात. ‘न हे व्रत घेतले अंधतेने’ असं सांगणारा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा लढा अव्याहतपणे सुरूच आहे.

नाना पटोलेंनी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांची पाण्याची समस्या सोडवली. त्यांनी चुलबंद नदीवर अनेक ठिकाणी बंधारे बांधले व जलसिंचनाच्या सोयी सुरू केल्या. अनेक वर्ष रखडलेला दुर्गाबाई डोहचा प्रकल्प त्यांनी पूर्ण करून घेतला. नाना पटोले स्वतः शेतकरी असल्याने आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक कामं केल्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. सरकारी वन-जमीन कायद्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी समाज त्रासलेला होता.

वन-जमीन अतिक्रमण धारकांना पट्टे देण्याबाबत आग्रह असताना केंद्र शासनाच्या १० राज्यांतील वनजमिनींवरील अतिक्रमण १० सप्टेंबर २०२२ पर्यंत हटवण्याचे आदेश संबंधित राज्यांना देण्यात आले. त्यामुळे मोठ्या संख्येने असलेल्या भूमिहीन, शेतमजूर, आदिवासी समाजावर उपासमारीची पाळी येणार होती. त्यांनी समस्या सोडवण्यासाठी नाना पटोलेंकडे धाव घेतली आणि नानाभाऊंनी कसलाच विचार न करता अन्यायाविरुद्ध लढायची तयारी केली. हा अन्याय दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ५ सप्टेंबर २०२२ रोजी वनजमिनीवरील ‘अतिक्रमण हटाव’ विरोधी मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात १०,००० पेक्षा जास्त वन मजूर आदिवासी महिला पुरुष सहभागी होते. सरकारी धोरणांविरोधी घेतलेल्या आक्षेपामुळे या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना अटक करण्यात आली. यात नाना पटोलें सह १४७ शेतकऱ्यांचाही समावेश होता. त्यानंतर सर्वांना भंडारा कारागृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, तिथल्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे त्यांना नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तुरूंगातही सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण करण्याची आग्रही भूमिका नानाभाऊंनी आपल्या सहकाऱ्यांसह घेतली. त्यांच्या या निर्णयाने सरकारवर दबाव निर्माण झाला. संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस स्थगिती दिली. त्यामुळेच आदिवासी व भूमिहीन शेतमजूर यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला.

अशा अनेक बाबतीत नाना पटोले शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना हवी ती मदत करतात. त्यांच्या प्रदेशात शेतकरी मेळावे घेण्यापासून, ते शेत मालाला योग्य तो हमीभाव मिळवून देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत ते स्वतः लक्ष घालतात. त्यामुळेच ‘शेतकऱ्यांचा विकास, हाच नाना पटोलेंचा ध्यास’ असल्याचं लोक मानतात. नानाभाऊंनी शेतकऱ्यांना योग्य न्याय आणि मान-सन्मान मिळवून देतील, बळीराजा हा खऱ्या अर्थाने ‘राजा’ होईल हा विश्वास आजवरच्या कार्यातून शेतकऱ्यांना दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT