Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Electricity : सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठा करू : अजित पवार

Ajit Pawar : साडेआठ हजार मेगावॉट वीज निर्मितीचे प्रकल्प पूर्ण होऊन, येत्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठा करू, आम्ही काम करणारी माणसे, जो वादा करतो तो आम्ही पूर्ण करतो, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांनी दिला.

मुकूंद पिंगळे

Nashik News : शेतकऱ्यांना वीजबिल माफी करून न्याय दिला. त्यामुळे विरोधकांना न जुमानता ही योजना भविष्यातही सुरू ठेवू. शेती व शेतकरी बांधवांना समृद्धीकडे नेणार आहोत. काँग्रेसप्रमाणे शेतकऱ्यांना फसवी वीजबिल माफी दिलेली नाही.

साडेआठ हजार मेगावॉट वीज निर्मितीचे प्रकल्प पूर्ण होऊन, येत्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठा करू, आम्ही काम करणारी माणसे, जो वादा करतो तो आम्ही पूर्ण करतो, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांनी दिला.

महायुतीचे निफाड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. १४) आयोजित सभेत पवार बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, भाजप नेते यतीन कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, विश्वास मोरे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ‘‘सरकारमध्ये राज्याचा विकास करण्यासाठी गेलो. राज्याचे प्रश्न सुटावेत. पश्चिमेकडे पडणारे पाणी पूर्वेकडे आणायचे आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणे उशिरा भरतात. त्यानंतर मराठवाड्यातील जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव अशी धरणे भरतात. पाण्याचा प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने गहन आहे.

महाराष्ट्रात पुन्हा हे सरकार का आणायचे आहे, कारण केंद्रात आपले सरकार आहे. त्यांच्या मदतीने भरघोस निधी आणता येईल, प्रश्न सोडविता येतील. सरकारमध्ये सामील झाल्यानंतर जात-पात, धर्म न पाहता सामान्यांसाठी योजना राबवल्या. विरोधकांनी टीका केली. मात्र शिवराय, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे हे सरकार आहे.’’

ऊस उत्पादकांना ३५०० रुपयांवर भाव मिळावा

राज्यातील अनेक बंद साखर कारखाने सुरू केले. त्यांना पाठबळ दिले. कारखान्यांची गाळप क्षमता वाढली पाहिजे. जे कारखाने कष्ट करण्याची तयारी ठेवून आपले कामकाज पुढे नेत आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक शिस्त आहे, अशा माझ्या भागातील माळेगाव कारखान्याने ३६३६ व सोमेश्वर कारखान्याने ३५७१ रुपये भाव दिला. राज्यातही ३५०० रुपयांवर भाव देत आला पाहिजे, यासाठी काम केले पाहिजे. कारखाने कर्जमुक्त असतील तर चांगला भाव देऊ शकतात, असे पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain in Maharashtra : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात पावसाचा 'येलो अलर्ट'  

Onion Management : दर्जेदार कांदा उत्पादनासाठी अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

Election Expenditure : खर्च तपासणीसाठी गैरहजर राहणाऱ्या १२ उमेदवारांना नोटिसा

Digital Water Management : ‘डिजिटल वॉटर मॅनेजमेंट’ उपक्रमाची संकल्पना

Kolhapur Soybean Rate : हमीभाव केंद्रावर सोयाबीनची विक्रीसाठी नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT