Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना करू

Cast Census : आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तीन पक्ष राष्ट्रवादी, उबाठा, काँग्रेस, डावे पक्ष यांची महाविकास आघाडी स्थापन केली.

Team Agrowon

Jalna News : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास जातीनिहाय जनगणंना करण्याचे आश्‍वासन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घनसावंगी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता. १०) बोलतांना व्यक्त केले.

यावेळी खासदार कल्याण काळे, फोजीया खान, राजेश टोपे, राजेश राठोड, उत्तमराव जानकर, भुषणसिंह राजे होळकर, मिलिंद आव्हाड, विजय बोराडे, संदेश चव्हाण, निसार देशमुख, सुरेखा लहाने यांची उपस्थिती होती.

श्री. पवार म्हणाले, की ज्यावेळी देशाची लोकसभेची निवडणूक होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिका मांडत होते. या भूमिकेतून त्यांना शेतकऱ्या‍यांचे प्रश्‍न, उद्योगांचे प्रश्‍न मांडण्याऐवजी त्यांना चारशे जागा पाहिजे होत्या. परंतु या चारशे जागा मिळण्यासाठी त्यांना संविधानात घटनेत बदल व छेडछाड करायची होती.

परंतु कॉंग्रेस, शिवसेना, देशातील सर्वच डाव्या पक्षांना सोबत घेऊन देशांच्या नावाने इंडिया आघाडी स्थापन करून त्यांना रोखण्यात यश मिळवले. आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तीन पक्ष राष्ट्रवादी, उबाठा, काँग्रेस, डावे पक्ष यांची महाविकास आघाडी स्थापन केली.

सत्ता बदलायची आहे. यासाठी सर्वसामान्यांच्या संसारात बदल झाला पाहिजे. सामान्य माणसाचे जीवनमान प्रश्‍न सोडविण्याचे काम करायचे आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सामोरे जात असतांना आपल्यासमोर दुसरी शक्ती आहे. दुसऱ्या शक्तीकडे मोदींचा पाठिंबा आहे.

त्यांच्याकडे सत्ता आहे, सत्तेच्या जोरावर तुम्हा लोकांना वेगळ्या ठिकाणी नेऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे. मात्र, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस कधी लोकं विसरणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना निष्ठा काय असते ते कळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT