Dam Water Level Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Project : सिंचन प्रकल्पांचे पाणलोट क्षेत्र तहानलेले

Team Agrowon

Amravati News : जून व जुलैमध्ये आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ८६ टक्के पाऊस झाला. तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण मात्र कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे अद्याप निम्मेही भरलेले नाहीत. पावसाचे अद्याप अडीच महिने शिल्लक असल्याने आगामी काळात ते भरतील, असा विश्वास जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणात या वेळी ४६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. एक जून ते आतापर्यंत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसामुळे बरेचदा विसर्ग करण्याची वेळ आली होती. यंदा अद्याप ती स्थिती निर्माण झालेली नाही.

या धरणाच्या पाण्यावर जिल्ह्यातील बहुतांश सिंचनक्षेत्र व अमरावती शहरासह तालुके व ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत सद्यःस्थितीत ८५ दलघमी अर्थात ३३ टक्के जलसाठा आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप दमदार पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे त्यांचा जलसाठा कमी आहे.

या धरणांची जलसंचय पातळी बघितल्यास येत्या महिनाभरात जोरदार पाऊस झाल्यास जलपातळी शंभर टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने खबरदारी घेत पाणीपातळीवर लक्ष ठेवले आहे. लघू प्रकल्पांचीही जलपातळीची स्थिती अद्याप सुधारलेली नाही. जूनमध्ये पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याचा येवा झालेला नाही. त्याचा एकूणच परिणाम जलपातळीवर झाला आहे. तथापि पावसाचे अजून अडीच महिने शिल्लक असल्याने या कालावधीत अपेक्षा आहे.

सिंचन प्रकल्प जलसाठा टक्केवारी पर्जन्यमान

अप्पर वर्धा २५९.६१ ४६.०३ १९०

शहानूर १३.०१ २८.२६ २०९

चंद्रभागा २२.७० ५५.०२ २३७

पूर्णा १९.५६ ५५.३० २१६

सपन १८.८५ ४८.८३ २०४

पंढरी १०.३७ १८.३९ १९२

गर्गा -- -- --

बोर्डी नाला १.४२ ११.७२ --

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT