Watermelon Production Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Farming: ऐन उन्हाळ्यात कलिंगडाचा गारवा; अरुण शिंदेंची नाविन्यपूर्ण शेती चमकली!

Farmer Successs Story: पुणे जिल्ह्यातील कडूस येथील युवा शेतकरी अरुण शिंदे यांनी कलिंगड शेतीतून नव्या यशाची कहाणी लिहिली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी दीड एकरात ३८-४० टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे.

Team Agrowon

Pune News: कडूस-टोकेवाडी (ता. खेड) येथील युवा शेतकरी अरुण पोपट शिंदे यांनी पारंपरिक उन्हाळी पिकांना छेद देत आपल्या दीड एकर क्षेत्रावर कलिंगडाचे पीक घेतले. मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी कलिंगडाचे एकरी सुमारे २५ टन उत्पन्न मिळवले आहे.

कडूस आणि परिसरातील शेतकरी उन्हाळी हंगामात शक्यतो बाजरी, भुईमूग, कोथिंबीर, मेथी अशा पिकांना प्राधान्य देत आहेत. बाजरी, भुईमूग पिकातून कमी उत्पन्न हाती लागले तरी जनावरांच्या चाऱ्याची सोय होते. अन् कोथिंबीर व मेथीचे पीक म्हणजे बाजारभाव मिळाला तर ‘लॉटरी’ म्हणून पाहिले जाते. शेतात राबराब राबून लॉटरीसारखे ‘बनी तो बनी’ असे म्हणून पीक घेण्यापेक्षा अरुण शिंदे या युवा शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना छेद देत नावीन्यपूर्ण पीक म्हणून कलिंगडाची निवड केली.

उत्पादनाची गुणवत्तासुद्धा उत्तम ठेवली. मशागत, खते, कीटकनाशके, ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा प्रतिएकरी सुमारे ८०,००० रुपये खर्च झाला. परंतु ६५ दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर उत्पन्नातून चांगले फळ मिळाले. कलिंगडाला प्रतिकिलो नऊ रुपयांपासून तेरा रुपयांपर्यंत भाव मिळाला. तसा अपेक्षेपेक्षा बाजारभाव कमीच मिळाला. परंतु पारंपरिक पिकांपेक्षा कलिंगडाच्या पिकाने बऱ्यापैकी आर्थिक नफा मिळवून दिला, असे शेतकरी शिंदे यांचे म्हणणे आहे.

मेहनतीचा परिणाम म्हणून त्यांनी ६० दिवसांच्या कालावधीत कलिंगडाचे प्रतिएकरी जवळपास २५ टन उत्पादन घेतले आहे. सध्या फक्त एक एकर क्षेत्रावरील कलिंगडाची तोड सुरू आहे. अजून अर्धा एकर क्षेत्रावरील तोडीला काही दिवसांचा अवकाश आहे. दीड एकरातून त्यांना ३८ ते ४० टन उत्पन्न अपेक्षित आहे.

शिंदे यांनी शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत नावीन्यपूर्ण पीक घेऊन एक उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. आधुनिक सिंचन तंत्र, मल्चिंग पेपर आणि खते व्यवस्थापनाच्या उपयोगाने त्यांना आपले उत्पादन यशस्वीपणे वाढवले. मेहनत, पिकाची योग्य निवड, कामाचे नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतकऱ्यांना उत्तम नफा मिळवता येऊ शकतो, हे मात्र त्यांनी दाखवून दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

Maharashtra Economic Survey: अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी ९ हजार कोटी मंजूर; आर्थिक पाहणी अहवालात सरकारची माहिती

Livestock Health: कोथळीत जनावरांना ‘लाळ्या खुरकूत’चा प्रादुर्भाव

Sugarcane Production : उन्हापासून उसाचे उत्पादन वाचवण्यासाठी सेंद्रिय उपाय

Khapli Wheat: खपली गहू पेरणीत खानदेशात घट

SCROLL FOR NEXT