Agriculture Water Update Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Water Update : रोपवाटिका जगविण्यासाठी पंपाद्वारे पाणी देण्याची वेळ

Rice Sowing : पाऊस लांबल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. भात रोपांसाठी केलेल्या धूळपेरण्यांना पाऊस न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.

Team Agrowon

Ratnagiri Rice Farming News : पाऊस लांबल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. भात रोपांसाठी केलेल्या धूळपेरण्यांना पाऊस न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. अनेक ठिकाणी रोपे रुजून आली नाहीत. त्यामुळे पुन्हा पेरण्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. काही शेतकऱ्यांनी रोपवाटिका जगवण्यासाठी पंपाद्धारे पाणी देण्यास सुरुवात केली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मॉन्सूनचा पाऊस यंदा महिना संपत आला तरीही सुरू झालेला नाही. त्याचे परिणाम जिल्ह्यातील भातशेतीवर दिसू लागले आहेत.

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर संगमेश्‍वर, राजापूर या दोन तालुक्यांत धूळपेरण्या केल्या जातात. १ जूनपासून पूर्वमोसमी पाऊस पडल्यामुळे पेरण्या केलेल्या रोपांना आपसूकच पाणी मिळते. यंदा पूर्वमोसमी पाऊसच न झाल्यामुळे धूळपेरण्या केलेल्या शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.

राजापूर, संगमेश्वरमधील शेतकऱ्यांनी २ जूननंतर पेरण्या केल्या होत्या. वीस दिवस झाले तरीही पाणी न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी रोपे रुजून आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या करण्यासाठी पावले उचलली आहेत. संगमेश्‍वर तालुक्यातील राजवाडी येथील सुमारे वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी पेरलेली रोपे रुजूनच आलेली नाहीत.

त्यातील काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या करण्यासाठी पावले उचलली आहेत. पहिल्या बियाण्यांचा खर्च वाया जाणार आहे. येथील शेतकरी सुहास ऊर्फ बंड्या लिंगायत यांनी रोपांना पंपाद्धारे पाणी दिले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे, नाचणे येथील शेतकऱ्यांनीही याच पद्धतीने रोपवाटिकांना पाणी दिले आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सर्वसाधारपणे ३० टक्के पेरण्या झाल्या. त्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामधील रोपांची रुजवात झालेली नाही. जिथे जमिनीत ओलावा आहे, तिथे रोपे रुजून आलेली आहेत.

उर्वरित ठिकाणी जमीन जशीच्या तशी आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या शक्यतेने पेरणीपूर्वीची मशागतीची कामेही सुरू केली. पण त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.

पहिल्या पावसामध्ये बियाणे पेरले असून रोपेच रुजून आलेली नाहीत. चांगल्या दर्जाचे बियाणे खरेदी करून ते पेरले होते. तो खर्च वाया जाऊ नये यासाठी पंपाच्या साह्याने पाणी देण्यास सुरुवात केली आहे. उन्हाचा कडाका असल्यामुळे पेरलेले बियाणे किती रुजून येईल हे सांगणे कठीण आहे. राजवाडी परिसरातील काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या करण्यासाठी पावले उचलली आहेत.
सुहास ऊर्फ बंड्या लिंगायत, राजवाडी, संगमेश्‍वर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT