Agriculture Research Center  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Research Center : कृषी संशोधन केंद्राचा पाणीपुरवठा १८ दिवस बंद

Water Supply Issue : कृषी संशोधन केंद्राला पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. तब्बल १८ दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे.

Team Agrowon

Pune News : स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापित गणेशखिंड येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गतच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राला पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. तब्बल १८ दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना देऊनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. त्यामुळे केंद्रातील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये संताप आहे.

पुण्याच्या नावलौकिकात भर पाडणाऱ्या जुन्या ऐतिहासिक संशोधन संस्थांमध्ये विभागीय कृषी व फळ संशोधन केंद्राचा उल्लेख केला जातो. पुणे विद्यापीठाच्या मागील बाजूस ५६ हेक्टर जागेत हे वनस्पतिशास्त्र उद्यान विस्तारले आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचलेले ‘गणेश डाळिंब’ असो, लोकप्रिय झालेला ‘सरदार पेरू’ किंवा विषाणूजन्य प्रतिकारक्षम ‘विमुक्ता भेंडी’ असे अनेक उत्पादनक्षम वाण या केंद्रातून नावारूपाला आले.

या केंद्राने ७ लाख ५० हजार रुपये थकित रक्कम मुदतीपूर्वीच जमा केली. तरीही महापालिकेने पाणीपुरवठा थांबविला. पाणीपट्टी भरल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर २२ डिसेंबर रोजी पाणी सुरू झाले. मात्र, पूर्वसूचना न देता २९ डिसेंबरपासून पुन्हा पाणीपुरवठा थांबविला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

संशोधनासाठी राहणाऱ्या विद्याथ्यांचे वसतिगृह संस्थेत

माळी प्रशिक्षण वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासवर्ग सुरू

संस्थेच्या जागेत ३३ निवासस्थाने, कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे वास्तव्यास

पाण्याअभावी विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची गैरसोय

केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या महापालिकेकडे फेऱ्यावर फेऱ्या

पाणीपुरवठा सुरू व्हावा, या साठी गुरुवारी (ता. ११) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवार यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना सूचना दिल्या आहेत. परंतु संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे केंद्रातील कर्मचारी, विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.
डॉ. रवींद्र बनसोड, सहयोगी संशोधन केंद्र, विभागीय कृषी संशोधन केंद्र, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT