Tanker Water Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Water Supply : सातारा जिल्ह्यात ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा

Satara Water Shortage : सातारा जिल्ह्यात टंचाई झळा वाढू लागल्याने टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहेत.

Team Agrowon

Satara Water News : सातारा जिल्ह्यात टंचाई झळा वाढू लागल्याने टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील ३९ गावे १२१ वाड्यावस्त्यांवरील जनतेस पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाचे आगमन लांबत असल्याने पाणी टंचाई भीषण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यभरात उष्णतेच्या लाटा वाढल्याने नागरिकांना हैराण केले आहे. अनेक ठिकाणी उष्माघाताचा त्रास सुरू झाला आहे. वाढत्या उष्णतेने जमिनीतील पाण्याचा स्तर कमी झाल्याने बहुतांश ठिकाणी विहिरी व बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागांत पाणीटंचाईचा भीषण होऊ लागली आहे.

यासाठी शासनाने टंचाईग्रस्त भागात टॅंकर सुरू केले आहेत. जिल्ह्यातील ३९ गावे १२१ वाड्यावस्तीवरील ४५,६८२ ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये माण तालुक्यात २० गावे ११२ गावांत १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यात एका गावात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Subsidy: ट्रॅक्टरसाठी १.२५ लाख अनुदान, कृषी यांत्रिकीकरणासाठी आणखी २१८ कोटी निधी

Labour Rates : भात आवणीसाठी मजुरांना आला भाव

Urea Shortage : युरिया खताचा तुटवडा तातडीने दूर करा; सक्तीची विक्री थांबवा

Solapur Silk Market : राज्यातील चौथ्या रेशीम बाजारपेठेचा सोलापुरात प्रारंभ

Modern Machines: दोन ओळी आणि दोन फळझाडांमधील तण काढणारे आधुनिक यंत्र, राहुरी विद्यापीठाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT