Dam Water Reservoir  Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Reservoir : खानदेशात जलसाठा किंचित वाढला

Khandesh Water Update : खानदेशात मागील काही दिवसांत जलसाठा किंचित वाढून २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. परंतु अनेक मोठे, मध्यम प्रकल्प कोरडे आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील काही दिवसांत जलसाठा किंचित वाढून २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. परंतु अनेक मोठे, मध्यम प्रकल्प कोरडे आहेत. सातपुडा पर्वत भागातील प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. परंतु अन्य भागांत जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे.

जळगाव जिल्ह्यानजीक गिरणा नदीवरील गिरणा धरणात जलसाठा अल्प आहे. मागील वर्षी जुलैअखेर गिरणा धरणात ३० टक्के साठा होता. यंदा फक्त १४ टक्के साठा आहे. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. जुलैमधील पावसाने गिरणातील जलसाठा फक्त तीन टक्के वाढला आहे.

या धरणातून चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहरांसह १०० गावांच्या पाणी योजनांना पाणी दिले जाते. तसेच २१ हजार हेक्टर क्षेत्रास त्याचा लाभ आहे. मागील वर्षी गिरणा धरण फक्त ५६ टक्के भरले होते. यंदा हे धरण पूर्ण भरेल, अशी अपेक्षा होती. पण धरणक्षेत्रात पाऊस न झाल्याने अडचण तयार झाली आहे. या धरणाचा लाभ चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या भागांस आहे.

जामनेर तालुक्यातील वाघूर धरणातील जलसाठा सुमारे २६ टक्क्यांनी वाढला आहे. त्यात ६३ टक्के जलसाठा आहे. हे धरणही जळगाव, जामनेर शहरासह काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याची साठवण क्षमता नऊ टीएमसी आहे. जळगाव, भुसावळातील रब्बीसही त्यातून पाणी दिले जाते. वाघू नदीचे उगमक्षेत्र सातमाळा, अजिंठा डोंगरात आहे. या भागातही जोरदार पाऊस झालेला नसल्याने धरणात आवक कमी राहिली आहे.

...या प्रकल्पांतून विसर्ग

खानदेशात नंदुरबारमधील दरा, देहली, सुसरी, चिरडे, धुळ्यातील अनेर, मालनगाव, जळगावातील मोर, हरिपुरा, वड्री, निंबादेवी, सुकी या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग होत आहे. हे सर्व प्रकल्प सातपुडा पर्वतालगत आहेत. सातपुडा भागात चांगला पाऊस झाल्याने या भागातील कमाल सिंचन प्रकल्प भरले आहेत. तसेच तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणासह तापी नदीला शेळगाव, सुलवाडे, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

या भागात स्थिती बिकट

जळगावातील मन्याड, बोरी व भोकरबारी हे प्रकल्प कोरडे आहेत. तसेच अंजनी, तोंडापूर, बहुळा, अग्नावती, मंगरूळ व अभोडा या प्रकल्पांतील जलसाठा फारसा वाढलेला नाही. रावेरमध्ये पाऊस कमी राहिल्याने अभोडा व मंगरूळ प्रकल्पातील जलसाठा यंदा ९० टक्क्यांखाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा व कापूस दर दबावात; शेवग्याला चांगला उठाव, मक्याची आवक स्थिर, तर कारलीच्या दरात चढ–उतार कायम

Local Body Elections: नळदुर्गमध्ये वीस मतदान केंद्रे

Farm Labour Shortage: सुगी आली तोंडावर, मजूर मिळेनात बांधावर 

Sanjay Raut on Bihar Election results: 'त्यांना ५० च्या आत संपवले!' बिहार निकालावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया

Hawaman Andaj: उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका; सकाळी थंडी वाढली तरी दुपारी उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT