Kolhapur Dams Water agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Dams Water : वारणा, राधानगरीचा पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत, कोल्हापूरच्या धरणांतील स्थिती अशी

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून कमी झालेल्या पावसाने मागच्या २४ तासांपासून मात्र पुन्हा हजेरी लावली.

sandeep Shirguppe

Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून कमी झालेल्या पावसाने मागच्या २४ तासांपासून मात्र पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू होती. तर धरण क्षेत्रात पावसाची बरसात झाली.

त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. मात्र, नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. राधानगरी धरणात ४ टीएमसी पाणीसाठा आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार धरणातून १ हजार ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगांव, दुधगंगा नदीवरील दत्तवाड असे १३ बंधारे पाण्याखाली आहेत.

धरणातील पाणीसाठी टीएमसीमध्ये

राधानगरी ४, तुळशी १.८०, वारणा १७.४७, दूधगंगा ९.२५, कासारी १.३२, कडवी १.७५, कुंभी १.१४, पाटगाव २.४३, चिकोत्रा ०.५४, चित्री १.१५, जंगमहट्टी १.०२, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, आंबेआहोळ १.०२, सर्फनाला ०.२८ व कोदे लघु प्रकल्प ०.२१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. (फूट)

राजाराम १६.४, सुर्वे १९.८, रुई ४४.६, इचलकरंजी ४२, तेरवाड ३९, शिरोळ ३१, नृसिंहवाडी २४.६, राजापूर १४ तर नजीकच्या सांगली ७.६ फूट व अंकली ८.४ फूट अशी आहे. जिल्ह्यातील १८ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणातून आज १ हजार ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

भात ऊस पिकाला पोषक

शहर आणि परिसरात तीन दिवस पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. बुधवारी (ता.१०) पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ऊन आणि पाऊस असा खेळ दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण बेताचेच होते. आज मात्र जिल्ह्यात पाऊस पुन्हा बरसला. शहरात दिवसभरात पावसाच्या मोठ्या सरी आल्या. धरण क्षेत्रातही पाऊस सुरू होता.

राजाराम बंधारा येथे काल(ता.१२) सायंकाळी ६ वाजता येथे पाणी पातळी १६ फूट ११ इंच होती. पावसाच्या विश्रांतीमुळे कोळपणी, भांगलण, मशागत या शेतीच्या कामांना गती मिळाली. पावसाची ही स्थिती भुईमूग, सोयाबीन, भात, ऊस यांना पोषक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT