Kolhapur Rain Update agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain Update : पावसाचा जोर आणखी वाढणार; धरणातील पाणीसाठा वाढला, १४ बंधारे पाण्याखाली

Weather Forecast : शुक्रवारी (ता. ५) नक्षत्र बदलत असून, तरणा नक्षत्र सुरू होत आहे. हत्ती हे वाहन असून, त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Weather Rain : कोल्हापूर जिल्ह्यात जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी मुसळधार पावसाने सुरूवात केली नव्हती. दरम्यान जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच दमदार पावसाने सुरूवात केल्याने जिल्ह्यातील नद्यांनी पात्र ओलांडलं आहे. मागच्या ८ दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. तसेच जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या जोर वाढत आहे.

राधानगरी आणि काळम्मावाडी या मुख्य धरणातील पाणीसाठी दिवसागणिक वाढू लागला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील १४ बंधारे पाण्याखाली गेले असून, राजाराम बंधारा येथे आज सकाळी ७ वाजता नदीची पाणी पातळी २१ फूट ११ इंच इतकी नोंदवण्यात आली. पावसाचा जोर असल्याने शेतात रोप लावणीच्या कामाची लगबग सुरू आहे.

मॉन्सूनचे आगमन लवकर होणार असून, यंदा शंभर टक्के मॉन्सूनचा पाऊस पडेल, असा अंदाज मे महिन्याच्या शेवटी वेधशाळेने वर्तवला होता. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाची प्रतीक्षा होती. जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाली. जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाने दमदार सुरुवात केली. धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली असून, अनेक ठिकाणी पाणी पात्राबाहेर आले आहे.

शुक्रवारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता

शुक्रवारी (ता. ५) नक्षत्र बदलत असून, तरणा नक्षत्र सुरू होत आहे. हत्ती हे वाहन असून, त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज आहे.

जिल्ह्यातील धरणांची स्थिती( टीएमसीमध्ये)

राधानगरी २.७८, तुळशी १.४०, वारणा १२.७४, दूधगंगा ५.१०, कासारी ०.९८, कडवी १.३३, कुंभी ०.९३, पाटगाव १.७२, चिकोत्रा ०.५१, चित्री ०.६३, जंगमहट्टी ०.५४, घटप्रभा १.५६, जांबरे ०.६५, आंबेआहोळ ०.९०, सर्फनाला ०.०८ व कोदे लघु प्रकल्प ०.१२ इतका पाणीसाठा आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे बंधारे पाण्याखाली आहेत तर वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव तसेच भोगावती नदीवरील सरकारी कोगे, कासारी नदीवरील यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली असे १४ बंधारे पाण्याखाली आहेत.

बंधाऱ्यांची पाणी पातळी अशी (फूट)

राजाराम २१.११, सुर्वे २२, रुई ५०, इचलकरंजी ४७.८, तेरवाड ४४, शिरोळ ३३, नृसिंहवाडी २६, राजापूर १६.३ तर नजीकच्या सांगली ९.९ व अंकली ११ फूट अशी पाणी पातळी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT