Water Crisis
Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : सांगली जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांनी गाठला तळ

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने मध्यम व लघू प्रकल्प कोरडे पडले असून, विहिरींनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये केवळ ३० टक्के पाणीसाठा असल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

मोरना (ता. शिराळा), सिद्धेवाडी (ता. तासगाव), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ), संख, दोडनाला (ता. जत) हे पाच मध्यम प्रकल्प असून, तिथे १ हजार ७६० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. सध्या केवळ ४९७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, २८ टक्केच पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात ७८ लघू प्रकल्प असून, सहा हजार १५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता आहे. या ठिकाणी १ हजार ८५७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ३१ टक्के आहे. मध्यम आणि लघू असे ८३ प्रकल्प जिल्ह्यात आहेत.

यापैकी कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी एक तलाव, आटपाडी चार, जत दोन तलावांमध्ये सध्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. १७ तलाव कोरडे ठणठणीत असून, १४ तलावांमध्ये मृतपाणीसाठा आहे.

१७ तलाव कोरडे

तासगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यांत प्रत्येकी १, जत १० आणि कवठेमहांकाळ तालुक्यात ११पैकी ४ तलाव कोरडे पडले आहेत. येथील विहिरी, कूपनलिकांनी नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठला आहे.

जिल्ह्यातील ८३ प्रकल्प तलावांमध्ये १५ नोव्हेंबर २०२२ रोजी ६ हजार ८२५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. या पाणीसाठ्याची टक्केवारी ८८ होती. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्ह्यात २ हजार ३५४ दशलक्ष घनफूट म्हणजे ३० टक्के पाणीसाठा आहे. या आकडेवारीवरून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येत आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Consumption : सर्वाधिक कापूस वापराचे ठरले दुसरे वर्ष

Pune APMC : पुणे बाजार समितीमधील गैरप्रकार विधानसभेत गाजणार

Monsoon: राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा

Animal Vaccination : पुणे जिल्ह्यात १८ लाख ८४ हजार जनावरांचे लसीकरण

Crop Loan Policy : केंद्राच्या धोरणाला हरताळ फासता का?

SCROLL FOR NEXT