Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : भर पावसाळ्यातही पुरंदर तालुका तहानलेलाच

Water Shortage : पावसाळ्याचे जवळपास पावणेदोन महिने होत आले आहेत. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दुष्काळाचे सावट अद्यापही तसेच आहे.

Team Agrowon

Pune News : पावसाळ्याचे जवळपास पावणेदोन महिने होत आले आहेत. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दुष्काळाचे सावट अद्यापही तसेच आहे. त्यामुळे नागरिकांना अजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने तालुक्यात ६३ टँकरच्या २०२ खेपा सुरू असून त्याद्वारे पुरंदर तालुक्यातील जनतेची तहान भागविली जात आहे.

गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे जवळपास वर्षभर टॅंकर सुरू आहेत. उन्हाळ्यात टॅंकरच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. त्यानंतर जूनमध्ये मॉन्सून दाखल झाल्यावर चांगला पाऊस होण्याची अपेक्षा होती. परंतु अद्यापपर्यंत तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे भूजलपातळीत अजूनही वाढ झालेली नाही. सध्या अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे नागरिकांना पिण्यासाठी, पशुधनासाठी व शेतीसाठी लागणारे पाणी याबद्दल मोठा प्रश्न आहे.

तालुक्यातील २८ गावठाणांसह, २७१ वाड्या-वस्त्यांवर ६३ पाण्याचे टँकर सुरू आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच शेती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. सद्यःस्थितीत तालुक्यातील ७६ हजार ४६३ लोकसंख्येला व पशुधन गाय, म्हैस, शेळ्या-मेंढ्या एकूण ६० हजार ७०० पशुधनास टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

मागील वर्षी, अतिअल्प पर्जन्यमान झाले होते. शासनाकडून दुष्काळ जाहीर केला होता. केंद्रस्तरीय समितीने दुष्काळाची दाहकताही तपासली; मात्र, त्यावर उपाययोजना केल्या नाहीत. छावण्या चालू कराव्यात, विविध गावांना पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, तालुक्यातील बंद योजना त्वरित चालू कराव्यात आदी मागण्या नागरिकांनी शासनाकडे केल्या होत्या.

मात्र, संबंधित प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली नव्हती. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक गावांत, वाड्या- वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. काही गावांतील टँकर पावसाळा सुरू झाल्यानंतर बंद केले. मात्र, अद्यापही अनेक गावठाणांसह, वाड्या-वस्त्यांवर

टॅंकर सुरू असल्याने दुष्काळाची दाहकता कमी झाली नाही. पावसाळा सुरू होण्याआधी तालुक्यात ४२ गावठाणांसह, ३६३ वाड्या-वस्त्यांवर ९३ टँकरद्वारे २८८ खेपा सुरू होत्या, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

नाझरे धरण कोरडेठाकच

पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण कोरडेठाक आहे. तर, गराडे, माहूर या धरणात अद्याप ३० टक्केच पाणीसाठा आहे. तसेच घोरवडी, वीर नाला, पिंगोरी, पिलाणवाडी, पिसर्वे या धरणात अतिअल्प पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होऊनही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्याने अनेक भागातील धरण, विहीर, ओढे-नाले, तलाव कूपनलिका अद्यापपर्यंत कोरडेठाक आहेत.

...या ठिकाणी टँकर सुरू

वाल्हा, वागदरवाडी, रिसे, पिसे, राजुरी, साकुर्डे, दौंडज, दिवे, झेंडेवाडी, जेजुरी ग्रामीण, खळद, नायगाव, आडाचीवाडी, खानवडी, कुंभारवळण, नावळी, मावडी क. प, वाळूंज, निळूंज, पारगाव, जवळार्जुन, पिंपळे, परिंचे, पिंपरी, बेलसर, नाझरे क.प., नाझरे सुपे, शिवरी, सटलवाडी, कोळविहिरे, खेंगरेवाडी, पांगारे, बो- हाळवाडी, वाल्हा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT