Water Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : जळगावमध्ये भर पावसाळ्यात पाणीटंचाई

Jalgaon Rain Update : जळगाव जिल्ह्यात अद्याप चांगला पाऊस अद्यापही रूसलाच आहे. जून महिन्यात केवळ ३६.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon Rain News : जळगाव जिल्ह्यात अद्याप चांगला पाऊस अद्यापही रूसलाच आहे. जून महिन्यात केवळ ३६.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी जून महिन्यात सरासरी ७२.४ टक्के पाऊस झाला होता. यंदा निम्मे पर्जन्यमान घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीटंचाईच्या उपाययोजना सुरूच आहेत. जुलै महिना सुरू झाला, तरीही समाधानकारक पाऊस नसल्याने ३१ गावांत ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

राज्यात सर्वत्र पावसाचे दमदार आगमन झाले आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, ठाणे यासारख्या ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्यात मात्र अपेक्षेपेक्षा जून महिन्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यात पेरण्याही पूर्ण झालेल्या नाहीत.

आठवडाभरापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाने सर्वच तालुक्यांत हजेरी लावली. तरीही शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३६.५ टक्के पाऊस झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. अमळनेर व पारोळा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्ह्यात प्रामुख्याने ३१ गावांना ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे (कंसंत टँकरची संख्या). त्यात जळगाव तालुका- २ गावे (२), जामनेर- १० गावे (८), भुसावळ- २ गावे (३), बोदवड- १ गाव (१), पाचोरा- ३ गावे (५), चाळीसगाव- ९ गावे (१०), भडगाव आणि पारोळा तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

दरम्यान, ७६ गावांमधील ८१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर दोन गावांना तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी

जळगाव - २५.४

भुसावळ - १८.९

यावल - ३२.४

रावेर - ४०.९

मुक्ताईनगर - ३९.५

चोपडा -३७.३

एरंडोल - ४९.३

चाळीसगाव - ४४.४

जामनेर २४.५

पाचोरा - ४३.६

भडगाव - ३५.४

धरणगाव- २१.५

बोदवड - १४.७

अमळनेर - ५२.४

पारोळा - ६७.८

एकूण- ३६.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT