Chhatrapati Sambhajinagar Rain Update : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात सोमवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली जवळपास २६१ मंडळात हजेरी लावणारा पाऊस पाच मंडळात अतिवृष्टी रूपात बरसला. तर काही मंडळांमध्ये पावसाची हजेरी मध्यम ते दमदार स्वरूपाची राहिली.
छत्रपती संभाजीनगर मधील ८३ पैकी ७३ मंडळात पावसाची हजेरी लागली जिल्ह्यातील छत्रपती संभाजी नगर व भावसिंगपूरमंडळात अनुक्रमे ७९ व ८६.५ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली जिल्ह्यातील १२ मंडळात मध्यम पाऊस झाला.
पैठण, गंगापूर, वैजापूर, फुलंब्री, तालुक्यात पावसाचा जोर नसल्यात जमा होता. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २४ मंडळात पावसाची तुरळक, हलकी, मध्यम हजेरी लागली. या मंडळांपैकी टेंभुर्णी मंडळात दमदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ६१ मंडळात तुरळक हलकी मध्यम ते दमदार पावसाची हजेरी लागली.
केज तालुक्यात सरासरी ३५ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील नांदूरघाट मंडळात ८९ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. इतर मंडळांमध्ये १ ते ५२ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील सर्व ६० मंडळात हलका, मध्यम ते दमदार पावसाची हजेरी लागली.
जिल्ह्यातील लातूर तालुक्यात सरासरी ३८.७ मिलिमीटर, औसा २१.९ तर देवणी तालुक्यातील मंडळांमध्ये सरासरी ३९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व ४३ मंडळात हजेरी लावणारा पाऊस उमरगा मंडळात ७२ मिलिमीटर तर नळदुर्ग मंडळात ९२ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टी रूपात बरसला. उमरगा, वाशी, कळंब, तुळजापूर आदी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर मध्यम ते दमदार स्वरूपाचा राहिला.
जिल्हा निहाय पावसाची मंडळे (पाऊस मिलिमीटरमध्ये)
छत्रपती संभाजीनगर - हरसुल २०, आसेगाव १७.८, कन्नड ३२, चापानेर ३२, सुलतानपूर २४.८, निल्लोड २२.५, शिवना ३३.५, जरंडी ३६.३, आळंद २५
जालना जिल्हा - अनवा २१.५, हसनाबाद २०.३, टेंभुर्णी ४२.८
बीड जिल्हा - चौसाळा ५०.३, लिंबागणेश ५२.३, पाटोदा २१, दासखेड २२.३, धामणगाव १७, केज २८, युसूफ वडगाव ३१.८, हनुमंत पिंपरी ४९.८, विडा ३४, शिरूर कासार १८.५
लातूर जिल्हा - लातूर ५७.५, बाभळगाव ४६, हरंगुळ ५७.५, कासारखेडा १७.८, मुरुड ५८.५, गातेगाव २०.८, तांदुळजा ३१.३, चिंचोली २६.३, कनेरी ३२.५, औसा ३०.५, मातोळा २६.३, भादा ३०.५, बेलकुंड २६.३, उजनी २३, अंबुलगा २४.८, नागलगाव ५३.८, मोघा २४.३, हेर २१.८, शेळगाव १७.३, आष्टा १९.८, देवणी ५१.५, बोरोळ ३०.५, वलांडी ३७.८, साकोळ ३७.८.
धाराशिव जिल्हा - बेंबळी ३५, पाडोळी ३०.८, केशेगाव २०.८, ढोकी ४५, जागजी ६१, तेर ४९.३, सावरगाव २३.८, मंगरूळ १७.५, इटकळ ६०.३, जळकोट ५८.८, इट ४८.३, कळंब ३४, इटकुर २९.५, मोघा २६, शिराढोण ३१.८, डाळिंब ४४.५, मुळज ४९, मुरूम ५५, जेवळी २०, पारगाव ४८.३.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.