Nashik News : धरणांच्या इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची स्थिती आहे. प्रशासन मात्र टँकर मागणी कमी कशी करता येईल यावर ठाम भूमिका निभावताना दिसत आहे.
नागरिकांची काळजी घेताना प्रशासनाचे नेहमीच वराती मागून घोडे हे काही आदिवासींना नवे नाही. लहान बालकांपासून ते वृद्ध, युवक-युवती दीड-दोन किलोमीटरवरून डोंगर चढून उतरून पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहेत.
यामध्ये चिमुकल्यांचे आयुष्य अनवाणी पायाने उन्हातान्हात करपून जाताना दिसत असून धरणांच्या तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा अशी म्हणण्याची वेळ आदिवासींवर आली आहे.
इगतपुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आवळखेड ग्रामपंचायतीमधील हे विदारक चित्र नागरिकांपुढे उभे आहे. गावाच्या पायथ्याशी डोंगर उतारावर तीन विहिरी आहेत.
दरवर्षी विहिरींना तळ गाठल्यावर टँकर सुविधा उपलब्ध करण्यासाठी पावले उचलणे अपेक्षीत असताना तसे दिसत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विहिरींनी तळ गाठला म्हणून पाणी योजना बंद करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे पाणीपुरवठ्यासाठी ते अपुरे पडेल व ग्रामस्थ पाणी कमी प्रमाणात वापरतील यासाठी ती बंद केली असेल तर टँकर उपलब्ध करून तातडीने विहिरीत पाणी टाकल्यास वाड्यापाड्यांना पाणी उपलब्ध होईल.
दरवर्षी मार्चपासून डोक्यावर पाणी वाहावे लागते. टँकर प्रस्ताव का पाठवला जात नाही याचे कोडे अजून उलगडलेले नाही. तातडीने टँकर उपलब्ध करावेत, अशी अपेक्षा आम्ही प्रशासनाकडे करत आहोत.नामदेव कामडी, ग्रामस्थ, आवळखेड
घरातील कामे आटपून पाणी भरायचे व कामाला जायचे, यामुळे वैतागले आहे. पाणीपुरवठा बंद करून ठेवला आहे. विहिरीत पाणी कमी असल्याचे सांगितले जाते. मग टँकर वेळेत सुरू करण्यास का उशीर लावला जातोय.सुमनबाई भस्मे, ग्रामस्थ, आवळखेड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.