Water shortage in Karnataka agrowon
ॲग्रो विशेष

Water shortage in Karnataka : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पाणीबाणी, १४ हजारपैकी ७ हजार बोअरवेल पडले बंद

Bangalore Karnataka Drought : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये जलसंकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे.

sandeep Shirguppe

Karnataka Water Shortage : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये जलसंकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. कर्नाटक राज्यातील आयटी हब आणि महत्वाचे शहर असलेल्या बंगळुरूमध्ये तब्बल १४ हजार बोअरवेल आहे परंतु यातील ७ हजारांच्या आसपास ते सध्या कोरडे पडल्याने तेथील स्थानिकांवर पाण्यासाठी वेगळा मार्ग शोधण्याची वेळ आली आहे. यासाठी बंगळुरूच्या जलसंकटाचा आढावा घेण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली.

बंगळुरू पाणीपुरवठा मंडळ (BWSSB), बंगळुरु महानगरपालीका आणि ऊर्जा विभागाच्या अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी काबिनी आणि कृष्णा राजा सागर (KRS) जलाशयांमध्ये पुरेसे पाणी असल्याचे सांगितले आहे आणि सरकार बंगळुरूच्या आसपासच्या सर्व ११० गावांना पाणी पुरवेल.

पाणी टंचाईच्या झळा तीव्र

बंगळुरूमध्ये १४ हजार बोअरवेलपैकी ६ हजार ९०० बोअरना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. तसेच सर्व तलाव जवळपास कोरडे पडले आहेत. बंगळुरूसाठी दररोज २ हजार ६०० MLD (मेगालिटर प्रतिदिन) पाण्याची आवश्यकता आहे. भविष्यात पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता विचारात घेऊन बंगुळूरूच्या आसपास असलेल्या ११० खेड्यांना जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान काबिनी आणि केआरएस धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, “आम्ही जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सूनची अपेक्षा करत आहोत.” बेंगळुरूमध्ये सुमारे ५० टक्के बोअरवेल कोरडे पडले आहेत. ११ मार्च रोजी झालेल्या बैठकीत बंगळुरूच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील भूजल स्रोत भरून काढण्यासाठी कोरडे होणारे तलाव शुद्ध पाण्याने भरले जाणार आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, BWSSB, नागरी संस्था, फिल्टर बोअरवेलमधील पाण्याबाबत आढावा घेतला जाणार आहे. तसेच कोरडे पडलेल्या तलावाच्या पात्रांना पूर्णजिवीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत, योजनेचा एक भाग म्हणून, सुरुवातीला बेलंदूर, वरथूर, नयनदहल्ली, हिरोहल्ली, अत्तूर आणि जक्कूर येथील तलाव पुन्हा भरले जाणार आहेत.

BWSSB चे अध्यक्ष राम प्रसथ मनोहर यांनी सांगितले होते की तलावांमध्ये अपेक्षित सुमारे २०-३० MLD पाणी जोडणे अपेक्षित होते. बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) च्या सहकार्याने हा पुढाकार घेण्यात आला. शिवाय, पाणी माफियांचा मुकाबला करण्यासाठी कर्नाटक सरकारने खासगी पाण्याचे टँकरही ताब्यात घेतले आहेत.

“शहरातील सुमारे ५० टक्के बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. शहराबाहेरील स्त्रोतांकडून पाणीपुरवठा करण्यासाठी हजारो खाजगी पाण्याचे टँकर (नोंदणी करून) ताब्यात घेण्याचे आम्ही ठरवले आहे. आम्ही अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी दिली आहे. तसेच खाजगी पाणीपुरवठा धारकांकडून किती आकारणी करायचे याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. भविष्यात पाण्यासाठी दुधाचे टँकर वापरले जातील असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

Parbhani Voting Percentage : परभणी जिल्ह्यात सरासरी ७१.४५ टक्के मतदान

Rabi Sowing : रब्बी पेरणीला वेग, हरभऱ्याची लागवड जोरात

Vote Turnout : मतदानाचा टक्का वाढला, आता लक्ष निकालाकडे

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

SCROLL FOR NEXT