Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७४ गावांमध्ये पाणीटंचाई

Water Crisis : गेले दोन महिने वाढलेले तापमान आणि या वर्षी बंधारे उभारण्यात झालेली कुचराई यामुळे जिल्ह्यातील ७४ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : गेले दोन महिने वाढलेले तापमान आणि या वर्षी बंधारे उभारण्यात झालेली कुचराई यामुळे जिल्ह्यातील ७४ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत. मालवण आणि कुडाळ तालुक्यांत टंचाईची तीव्रता अधिक जाणवत आहे.

जिल्ह्यात या वर्षी तुलनेने पाऊस कमी झाला. त्यानंतर ऑक्टोबरनंतर जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. वनराई, मातिनाला बंधारे घालण्यात यावर्षी कुचराई झाली. याशिवाय दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी गेले दोन महिने तापमानवाढ कायम राहिली. परिणामी विहिरी, तलाव, नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली.

याचा मोठा परिणाम गावागावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांवर झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत जिल्ह्यातील ७४ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात मे च्या पहिल्या आठवड्यात याची तीव्रता अधिक होती.

पाणीटंचाईची सर्वाधिक झळ मालवण तालुक्याला बसली. या तालुक्यातील ३३ गावांमध्ये पाणीटंचाई असून १० गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. कुडाळ तालुक्यातील दहा गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे.

दोडामार्ग तालुक्यातील ५ गावे, सावंतवाडीतील ८ गावे, कणकवलीतील ६ गावे, वैभववाडीतील ९ गावे, देवगड तालुक्यातील ३ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. या गावातील पाणीटंचाई उपाययोजनांसाठी १ कोटी २४ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

काही गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई

जिल्ह्यात काही गावांमध्ये पाण्याचे स्रोत आहेत. परंतु ढिसाळ नियोजनाअभावी लोकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा गावांची संख्या देखील मोठी आहे.

जिल्ह्यात पाणीटंचाई चाहूल लागली असून तीव्र पाणीटंचाई अद्याप नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती नाही. जलजीवन मिशन योजनेतर्गंत अनेक कामे सुरू आहेत. या योजनेतर्गंत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळजोडणी पोहोचविण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
- उदयकुमार महाजनी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Municipal Election Result 2026: २९ महापालिका निवडणूक मतमोजणीस सुरुवात, मुंबईवर कुणाची सत्ता?

Sugar Industry: आर्थिक आरोग्याची त्रिसूत्री

Seed Bill: नवीन बियाणे विधेयकाला किसान सभेकडून विरोध

MoU For Smart Farming: महात्मा फुले कृषी विद्यापीठ,बायफ संस्थेत संशोधनासाठी करार

Cotton Scam: व्यापाऱ्यांच्या कवडीमोल कापसाला सर्वोच्च प्रतवारी

SCROLL FOR NEXT