Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : इचलकरंजीत पाणीटंचाईचे संकट

सातत्याने गळती लागत असल्यामुळे ३० मीटर जलवाहिनी बदलण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला.

Team Agrowon

Ichalkaranji water shortage News : शहरात पुढील काही दिवस भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या कृष्णा योजनेला पुन्हा शिरढोणजवळ मोठी गळती लागली आहे.

शनिवारी (ता. १८) रात्री यापूर्वी लागलेली गळती काढून पाणीउपसा सुरू केला होता. त्यानंतर रविवारी त्याच परिसरात मोठी गळती लागून, परिसरातील एक एकर शेतीमध्ये पाणी पसरले.

सातत्याने गळती लागत असल्यामुळे ३० मीटर जलवाहिनी बदलण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला. हे काम तीन ते चार दिवस चालण्याची शक्यता आहे. परिणामी, कृष्णा नदीतून पाणीउपसा बंद राहणार आहे.

शहराला बहुतांश पाणीपुरवठा कृष्णा नदीतून केला जातो. या योजनेची जलवाहिनी शिरढोणनजीक खराब झाली आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच गळती लागते.

त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होतो. चार दिवसांपूर्वी लागलेली गळती काढण्याचे काम शनिवारी रात्री पूर्ण केले. त्यानंतर नदीतून उपसा सुरू केला.

पण पाण्याच्या दाबामुळे शिरढोणमधील बाणदार हायस्कूलजवळ जलवाहिनी फुटली.

यातून बाहेर पडलेल्या पाण्यामुळे परिसरातील एक एकर शेती भिजली. माहिती मिळताच कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी पाहणी केली.

जलवाहिनी पूर्णपणे ठिसूळ झाली असून, वेल्‍डिंग करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे परिसरातील ३० मीटर जलवाहिनीच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT