Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : खानदेशात पाणीटंचाई वाढू लागली

Water Crisis : खानदेशात टंचाई स्थिती वाढत आहे. ११० पेक्षा अधिक गावांत टँकर सुरू आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात टंचाई स्थिती वाढत आहे. ११० पेक्षा अधिक गावांत टँकर सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, अमळनेर, पारोळा भागात टंचाई अधिक आहे. धुळ्यातही साक्री, शिंदखेडा, धुळ्यातील अनेक गावांत पाणीकपातीचे संकट आहे.

पुरेशा पावसाअभावी सिंचन प्रकल्प कोरडे राहिले. जळगाव जिल्ह्यातील निम्मे प्रकल्प कोरडे होते. त्यात गिरणा पट्ट्यातील सर्वच प्रकल्पांत अल्प जलसाठा आहे. त्यात मन्याड, भोकरबारी हे प्रकल्प कोरडे आहेत. तसेच बहुळा, अग्नावती, अंजनी, गिरणा या प्रकल्पांतही जलसाठा कमी आहे. धुळ्यातील मालनगाव, अमरावती, बुराई, सोनवद हे प्रकल्प आटण्याच्या उंबरठ्यावर आहेत. नंदुरबारातही नंदुरबार, नवापूर तालुक्यात नद्यांचे पात्रही कोरडे आहे. गिरणा नदीकाठी देखील टंचाई आहे.

धुळ्यातील सुमारे २२ गावांत टँकर सुरू आहेत. नंदुरबारातही टंचाईग्रस्त गावांची संख्या २५ पेक्षा अधिक आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादीही मोठी आहे. अनेक गावांत दोन-तीन दिवसाआड पाणी येत आहे. जळगाव जिल्ह्यात ४२ गावांत पाणीटंचाई असून, तिथे ५१ टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

चाळीसगाव तालुक्यातील २२ गावांतील २६, अमळनेर तालुक्यातील १३ गावांत १४, भडगाव तालुक्यातील तीन गावांसाठी तीन, भुसावळ तालुक्यातील दोन गावांत दोन, पारोळा तालुक्यातील चार गावांत चार, पाचोरा तालुक्यात तीन गावांना तीन, धरणगाव तालुक्यातील ९ गावांत १०, तर जामनेर तालुक्यातील तीन गावांत तीन अशा एकूण ५९ गावांत ६५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जळगाव जिल्हा परिषदेने २०२३-२४ साठी ५९२ गावांसाठी ९ कोटी ९० लाख ७४ हजार रुपयांचा संभाव्य कृती आराखडा तयार केला आहे.

टँकर सुरू असलेली गावे

तालुका गावे टँकर

चाळीसगाव २६ ३१

अमळनेर १२ १६

भडगाव २ २

भुसावळ १ १

पारोळा १ १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Variety: ‘बीएआरसी’कडून केळीची ‘म्युटंट’ जात विकसित

Agrowon Agri Expo: सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शन

CCI Procurement: ‘सीसीआय’ची दररोज १ लाख गाठी कापूस खरेदी

Silk Association MoU: परभणी येथील कृषी विद्यापीठ, सिल्क असोसिएशनमध्ये करार

Agriculture Department: लेखा परीक्षण अहवाल न दिल्याने ‘एसएओ’ला नोटीस

SCROLL FOR NEXT