Water Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईचे संकट गडद

Water Defict : नैसर्गिक स्रोत, प्रकल्प कोरडे पडू लागले

Team Agrowon


Baramati News : मोरगाव, ता. बारामती ः गरजेपेक्षा कमी पाणीपुरवठा, कोरडे पडलेले नैसर्गिक स्रोत व पावसाअभावी आटू लागलेले प्रकल्प यामुळे बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.

बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी वरदान असलेले नाझरे धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे. मृत पाणीसाठ्यावर आत्तापर्यंत या धरणावरील योजना सुरू होत्या. मात्र मृत पाणीसाठा देखील कमी झाला आहे. त्यामुळे अजून पंधरा दिवसांनी या योजना पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

यावर्षी पावसाने दडी मारल्याने नाझरे धरण १०० टक्के न भरल्यामुळे पुरंदर आणि बारामती दोन्ही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. मोरगाव प्रादेशिक योजनेमधून सध्या आंबी बुद्रूक, आंबी खुर्द ,भोंडवेवाडी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी, लोणी भापकर, जळगाव कप, जळगाव सुपे, भिलारवाडी, काऱ्हाटी, कऱ्हावागज, अंजनगाव, मावडी कप या गावांना पाणीपुरवठा होतो. सध्या धरणामध्ये मृत पाणीसाठ्याची पातळी ही अतिशय कमी झाली आहे.

जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया करून हे पाणी मोरगाव प्रादेशिक योजनेसाठी सोडले जात आहे. मात्र अपुऱ्या पाण्यामुळे १४ गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. अजून पंधरा दिवसच पाणीपुरवठा होऊ शकेल, इतकेच पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे येथील प्रश्न कसा सोडवायचा ही मोठी समस्या आहे.
जेजुरी ‘एमआयडीसी’साठी वीर धरणाचे पाणी येते. या पाण्याची मागणी पाणीपुरवठा योजनांसाठी करण्यात आली आहे. मात्र तत्पूर्वी जेजुरी नगरपालिकेने ही ‘एमआयडीसी’कडे पाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नाझरे वरील योजनांसाठी पाणी मिळण्याची शाश्वती कमी आहे.

‘वीर’मधील पाणी आणावे
विहीर अधिग्रहण करून किंवा पुरंदर तालुक्यातील इतर माध्यमांचा वापर करून धरणावरील योजनांना पाण्याची उपलब्धता केली तरच या योजना सुरू राहतील. अन्यथा मोरगाव प्रादेशिक योजनेवर अवलंबून असलेल्या १४ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने वीर धरणातील पाणी आणून पावसाळ्यापर्यंत योजना चालतील, असे नियोजन करावे, अशी बारामतीच्या जिरायती भागातील गावांची मागणी आहे.

उपलब्ध पाणीसाठ्यातील पाणी मोरगाव योजनेसाठी देण्याचे नियोजन केले आहे. पावसाळ्यापर्यंत पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा, यावर वरिष्ठ पातळीवरून नियोजन करण्याचे काम सुरू आहे.
- विकास बुरसे, शाखा अभियंता, मोरगाव प्रादेशिक योजना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT