Water Rights Agrowon
ॲग्रो विशेष

Water Rights: शेटफळेत उद्या पाणी संघर्ष परिषद’

Krishna Valley Struggle: राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कृष्णा खोऱ्यातील १३ दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी ३३वी पाणी संघर्ष परिषद गुरुवारी शेटफळे येथे होत आहे. "पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!" या निर्धाराने पुन्हा एकदा जलसंपदेसाठी संघर्ष पेटणार आहे.

Team Agrowon

Solapur News: लोकराजा राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कृष्णा खोऱ्यातील १३ दुष्काळग्रस्त तालुक्यांची ३३ वी पाणी संघर्ष परिषद, सिद्धनाथ मंगल कार्यालय शेटफळे (ता. आटपाडी) येथे गुरुवारी (ता. २६) दुपारी १ वाजता होणार असल्याची माहिती मंगळवेढा तालुका पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे दिली.

या परिषदेचे वैभव नायकवडी निमंत्रक असून या परिषदेमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव, माजी आमदार राजेंद्र देशमुख, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, ॲड. सुभाष पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर, ॲड. सरफराज बागवान, अनिल पाटील मार्गदर्शन करणार आहेत. 

‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ हा चळवळीचा केंद्रवर्ती हेतू ठेवून शेतकऱ्याच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही. टेंभू, म्हैसाळ, सांगोले शाखा, उरमोडी, नीरा, देवधर पाणी संघर्ष चळवळीमुळे सरकारला कृष्णा खोरे विकास महामंडाळाची स्थापना करायला भाग पाडले.

१० वर्षांपूर्वी आटपाडी, सांगोला तालुक्याला पाणी आले. अपूर्ण कामांच्या आणि हक्काच्या पाणी लढाईसाठी शेतकऱ्यांना लढावे लागणार आहे. त्यासाठीच परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रा. काळुंगे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurment : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार ४०० कोटी रुपये दिल्याची केंद्र सरकारची माहिती; सीसीआयच्या खरेदीपासून शेतकरी मात्र वंचित

Maharashtra Unseasonal Rain: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा

Village Governance: ग्रामसभा आणि ग्रामस्तरावरची अंमलबजावणी

Dam Water Storage: मंगरूळ, सुकी, अभोडा धरणांत जलसाठा मुबलक

Vidarbha Irrigation Projects: विदर्भातील ५ सिंचन प्रकल्पांची कामे भूसंपादनाअभावी प्रलंबित- गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT