Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : टॅंकरमुक्तीसाठी ‘जलसमृद्ध गाव अभियान’

Water Tanker : जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी ‘जलसमृद्ध गाव’ हे अभियान ५ जूनपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी ‘जलसमृद्ध गाव’ हे अभियान ५ जूनपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. यंदा टंचाईत ज्या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला अशा गावांमध्ये विहीर, बोअरवेल जल पुनर्भरण तसेच छतावर पडणारे पावसाचे पाणी अडवून संरक्षित करणे या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पर्यावरण दिन ५ जूनपासून या अभियानाला सुरुवात करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रदीप झोड, सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रमण इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने उपस्थित होते.

तालुका व गावपातळीवर समिती

अभियानासाठी तालुकास्तरावरील समित्या तयार करण्यात येतील. त्यात उपविभागीय अधिकारी अध्यक्ष तर गटविकास अधिकारी सदस्य सचिव असतील तसेच तहसीलदार, उपअभियंता पाणीपुरवठा, तालुका कृषी अधिकारी इ. हे या समितीचे सदस्य असतील. प्रत्‍येक गावातील जबाबदाऱ्या ग्राम पातळीवरील समितीकडे राहील.

तलाठी, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, ग्रामसेवक हे सदस्य असतील व ग्रामसेवक सदस्‍य सचिव म्‍हणून काम पाहतील. अभियान कालावधीत करण्यात येणाऱ्या पुनर्भरण उपाययोजनांच्या माहितीचे संकलन करुन साठवले जाणाऱ्या पाण्याची आकडेवारी व माहिती तहसिल व पंचायत समिती कार्यालयात संकलित करावी. तसेच गत वर्षीच्या तुलनेत जलसमृद्धतेने झालेल्या फरकाचेही दस्तऐवजीकरण करण्यात यावे असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

सार्वजनिक विहिरींचे प्राधान्याने पुनर्भरण

या अंतर्गत सार्वजनिक विहिरी, बोअरवेल यांचे पुनर्भरण प्राधान्याने करावयाचे आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी संरक्षित करण्यात येणार आहे. यासोबत जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, खासगी व्यक्ती, शेतकरी, संस्था, व्यावसायिक प्रतिष्ठाने यांनाही या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

अभियानाचा कालबद्ध कार्यक्रम

१ ते ३ जून - तालुकास्‍तरीय समितीची बैठक घेणे, बैठकीमध्‍ये पूर्ण तालुक्‍याचे या संदर्भातील अंदाजे नियोजन करणे.

३ ते ४ जून - गावनिहाय बैठक घेऊन प्राथमिक तयारी.

५ जून - पर्यावरण दिनानिमित्‍त प्रत्‍येक तालुका व ग्रामपंचायतस्‍तरावर जनजागरण, कार्यशाळा, व्‍याख्‍यान इत्‍यादी आयोजन.

६ ते १३ जून - शासकीय इमारती, विहीरी, बोअरवेल यांचे गावनिहाय सर्व्हेक्षण-माहिती संकलन व आराखडा करणे.

१४ जून - तालुकास्‍तरीय बैठक घेऊन कामांची एकूण संख्या व त्या अनुषंगाने खर्चाचे नियोजन, लोकवर्गणीसाठी प्रयत्‍न.

१५ ते ३० जून - प्रत्यक्ष कामाला सुरवात करुन संपूर्ण पावसाळाभर पडणारे पावसाचे पाणी साठवून पुनर्भरण करणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT