Krishna River Agrowon
ॲग्रो विशेष

Krishna River : कृष्णा नदीत पाणी उपसाबंदी लागू

Krishna River Irrigation Close : कृष्णा आणि वारणा धरणांत मर्यादित पाणीसाठा शिल्लक राहिल्याने कृष्णा नदीतून खासगी वापरासाठी पाणीउपसा करण्यास बंदी आदेश पाटबंधारे विभागाने जारी केले आहेत.

Team Agrowon

Sangli Krishna River News : कृष्णा आणि वारणा धरणांत मर्यादित पाणीसाठा शिल्लक राहिल्याने कृष्णा नदीतून खासगी वापरासाठी पाणीउपसा करण्यास बंदी आदेश पाटबंधारे विभागाने जारी केले आहेत. बुधवारपासून (ता. १४) चार दिवस उपसाबंदी असेल. पुढे १८ ते २० जूनपर्यंत उपशास मान्यता दिल्याचे आदेश कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी काढले आहेत.

कोयना आणि वारणा धरणांतील पाणीसाठा अत्यंत कमी राहिला आहे. त्यात पाऊस लांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सिंचन योजनांतून अखंड पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शेतकरी मागणी करत आहेत. अशा स्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचा प्रयत्न पाटबंधारेने सुरू केला आहे.

कोयना धरणातून पाणी कपात अपरिहार्य असल्याचे पाटबंधारे म्हटले आहे. त्याचा पहिला भाग म्हणून टेंभू योजनेपासून ते म्हैसाळ योजनेपर्यंतच्या टप्प्यात उपसाबंदी जाहीर केली आहे. या काळात शेतीसाठी खासगी उपसा करता येणार नाही.

पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मात्र सुरू राहतील. उपसा काळातदेखील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. उभी पिके जगवा, सूक्ष्म सिंचनाचा वापर करा, पाटाने पाणी देऊन पिके घेऊ नका, असे आवाहन केले आहे.

पाटबंधारे विभागाच्या सूचना

- १४ ते १७ जून - उपसाबंदी

- १८ ते २० जून - उपसा कालावधी

- बेकायदा उपसा केल्यास पाणी व विद्युत परवाना एक वर्षासाठी निलंबित, पंप संच जप्त करणार

- प्रदूषण, प्रक्रिया केलेले पाणी सोडल्यास सक्त कारवाई

- पिण्याच्या पाणीपुरवठा योजना अखंड सुरू राहणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT